मुख्यमंत्री शिवसेनेचा, त्यांना कोणी रोखलंय?; सेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 14:40 IST2021-03-28T14:32:25+5:302021-03-28T14:40:24+5:30
congress leader sanjay nirupam slams shiv sena and cm uddhav thackeray: संजय राऊतांची अनिल देशमुखांवर टीका; संजय निरुपम यांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

मुख्यमंत्री शिवसेनेचा, त्यांना कोणी रोखलंय?; सेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी
मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरणात समोर आलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण स्फोटक बनलं आहे. स्फोटक प्रकरणात असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात, त्यामुळे अडचणीत आलेलं सरकार, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यावरून भारतीय जनता
पक्ष आक्रमक झाला असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्येही ऑल इज वेल नसल्याचं दिसतं आहे.
देशमुखांना अपघाताने मिळाले गृहमंत्रीपद, राऊतांनी रोखठोक चालवले बाण
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेचे बाण सोडले. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावं लागलं असं एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट गृहमंत्र्यांनी कसं दिलं होतं, अशा पत्राचा स्फोट केला. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असलेला सचिन वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?, असा 'रोखठोक' सवाल राऊत यांनी विचारला.
शिवसेना ने महाराष्ट्र के गृह मंत्री के चाल-चलन पर शक जाहिर किया है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 28, 2021
राष्ट्रवादी कांग्रेस के मुखिया कह चुके है कि गृह मंत्री के भविष्य का फ़ैसला मुख्यमंत्री करें।
मुख्यमंत्री शिवसेना के हैं और मौन साधे हैं।
फिर एक्शन लेने से मुख्यमंत्री को किसने रोक रखा है ?#AnilDeshmukh
संजय राऊत यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेना वि. राष्ट्रवादी यांच्यात वाकयुद्ध रंगताना दिसत आहे. त्यातच आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेनं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या वर्तणुकीवर शंका उपस्थित केली आहे. गृहमंत्र्यांच्या भविष्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे आणि त्यांनी मौन धारण केलं आहे. त्यांना कारवाई करण्यापासून कोणी रोखलं आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ
राऊतांच्या विधानावर अजित पवार म्हणतात...
संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. 'सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांबद्दल अशी विधानं करू नये. एकमेकांविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी. ते काय बोलले, हे त्यांना माहीत आहे. पवारांनी अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले आहेत. अनेकदा उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू असताना कोणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये,' अशा शब्दांत पवारांनी राऊत यांनी अप्रत्यक्ष सल्ला दिला.