मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्ध थांबलेलं असताना आता काँग्रेस नेत्याच्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कंगनानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. यावेळी तिनं मुंबई महानगरपालिकेनं तिच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईची माहिती दिली. पालिकेची कारवाई अन्यायकारक असून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी तिनं राज्यपालांकडे केली. कंगनानं घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीवर काँग्रेस नेते उदित राज यांनी निशाणा साधला. कंगनानं तिची बहिण रंगोली चंडेलसह जवळपास पाऊण तास राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी एखाद्या वडिलांसारख्या माझ्या समस्या ऐकून घेतल्या. आता मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा कंगनानं राज्यपालांच्या भेटीनंतर व्यक्त केली. या भेटीवर उदित राज यांनी अतिशय तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 'व्यसनी कंगना रणौत आज राज्यपालांना भेटली. गोदी मीडिया, भाजप आयटी सेल आणि भक्त सगळेच समर्थन करत आहेत. चोर, अपराधी, भ्रष्ट अशा सगळ्यांचं स्वागत होऊ शकतो. फक्त तो भाजपचा समर्थक हवा,' असं ट्विट राज यांनी केलं आहे.
शिवसेनेचा सूर बदललाअभिनेत्री कंगना राणौतकडून दररोज शिवसेनेवर जोरदार हल्ले सुरू आहे. मात्र शिवसेनेनं आता आपला पवित्रा बदलला आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. देशात त्याहीपेक्षा महत्त्वाचे विषय आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनात आम्ही ते उपस्थित करू, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कंगनाच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं राऊत म्हणाले.कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; राऊतांनी शिवसेनेचा पुढील 'प्लान' सांगितला
भाजपच्या हालचाली, विधानांकडे लक्षमुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. मुंबई प्रत्येकाची आहे. मात्र तिला बदनाम करण्याचा हक्क कोणालाही नाही. सध्या कोणता पक्ष काय बोलतोय याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. सत्ता गेलेली मंडळी राज्याबद्दल काय बोलत आहेत, याची नोंद आम्ही ठेवत आहोत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपच्या प्रत्येक हालचालीवर आपलं लक्ष असल्याचं सांगितलं. एखाद्यानं ठरवलंच असेल की तमाशाच करायचा, तर करू द्या, असा टोलादेखील त्यांनी लगावला.VIDEO: 'मी ड्रग्जच्या आहारी गेले होते'; कंगना राणौतचा जुना व्हिडीओ व्हायरल
नाव न घेता कंगनावर निशाणामुंबईत येतेय, रोखून दाखवा असं आव्हान देऊन मुंबईत दाखल झालेल्या कंगनावर शिवसेनासंजय राऊत यांनी नाव न घेता निशाणा साधला. ज्या पोलिसांना नाव ठेवता, माफिया म्हणता, त्याच पोलिसांच्या संरक्षणात फिरता, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला लक्ष्य केलं. तुम्ही ज्या अभिनेत्रीचं नाव घेताय, तिचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे, असं म्हणत राऊत यांनी कंगनावर अधिक बोलणं टाळलं. ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला