Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:11 AM2021-07-26T11:11:54+5:302021-07-26T11:14:56+5:30

Lok Sabha: विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे.

congress manish tiwari claims modi govt proposal to increase strength of lok sabha to thousand mp | Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

Next
ठळक मुद्देलोकसभेत खासदारांची संख्या १ हजारवर जाणार?केंद्रातील मोदी सरकारचा प्रस्तावकाँग्रेस नेते मनिष तिवारी यांचा मोठा दावा

नवी दिल्ली:संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पहिला आठवडा पॅगेसस हेरगिरी प्रकरण आणि इंधनदरवाढ तसेच महागाई यांसारख्या मुद्द्यांवरून चांगलाच गाजला. अनेकदा दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले. विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. यातच आता लोकसभेत खासदारांचे संख्याबळ एक हजारांवर नेण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली असून, तसा उल्लेख एका प्रस्तावात करण्यात आल्याचा मोठा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (congress manish tiwari claims modi govt proposal to increase strength of lok sabha to thousand mp)

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सदर दावा केला आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी खासदारांचे संख्याबळ वाढवत १ हजार किंवा त्यापेक्षा जास्त असावे, असा उल्लेख केंद्र सरकारच्या प्रस्तावात असल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. 

याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख

नवीन संसदेत १ हजार जणांची आसनव्यवस्था

संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी, सन २०२४ पूर्वी लोकसभेचे संख्याबळ १ हजार किंवा त्याहून जास्त वाढवण्याचा भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली आहे. नवीन संसद भवन १ हजार जण बसू शकतील, अशा पद्धतीने बांधले जात आहे. पण हे करण्याआधी यावर गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे. ती सार्वजनिक असावी, असे ट्विट मनिष तिवारी यांनी केले आहे. 

हे मान्य नाही

मनिष तिवारी यांच्या ट्विटवर काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात सार्वजनिक वाद-विवाद होणे आवश्यक आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात लोकांमधून निवडून येणाऱ्या जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. पण ही वाढ जर लोकसंख्येच्या आधार होत असेल तर दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल आणि हे मान्य नाही, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

हर हर महादेव! ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा

दरम्यान, आताच्या घडीला लोकसभेत ५४३ आणि राज्यसभेत २४५ सदस्य आहेत. संसदेची नवी इमारत उभारली जात असून, सरकारने लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याचं संकेत सरकारने दिली आहे. लोकसभा संपूर्ण देशातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असून भविष्यात खासदारांची संख्या वाढवली जाऊ शकते, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. 
 

Web Title: congress manish tiwari claims modi govt proposal to increase strength of lok sabha to thousand mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.