शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

मुंबई काँग्रेसच्या स्वबळावर पक्षश्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 7:32 AM

हाय कमांड योग्यवेळी निर्णय घेईल, कमी बोलण्याचेही आवाहन.

ठळक मुद्देहाय कमांड योग्यवेळी निर्णय घेईल, कमी बोलण्याचेही आवाहन

गौरीशंकर घाळे

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईकाँग्रेसची मॅरेथॉन बैठक बुधवारी पार पडली. पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करू नये, स्वबळावरच निवडणुका लढवाव्यात, अशी आग्रही मागणी उपस्थित नेत्यांनी केली. यावर, हाय कमांड योग्यवेळी याबाबत निर्णय घेईल, तूर्तास सर्व नेत्यांनी संयमाने आणि एकदिलाने काम करावे, असा सबुरीचा सल्ला देतानाच, काही दिवस कमी बोलण्याचीही सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि विविध कमिट्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत प्रभारी एच. के. पाटील यांनी मॅरेथॉन बैठक घेतली. पालिका निवडणुकांसंदर्भात यावेळी चर्चा केली. यावेळी सर्वच नेत्यांनी स्वबळावर निवडणुकीचा आग्रह धरला. यावर, तूर्तास संयम बाळगण्याचा आणि कमी बोलण्याचा सल्ला एच. के. पाटील यांनी दिल्याचे समजते. 

पक्षाचा जनाधार टिकविण्यासाठी पालिकेत ‘एकला चलो रे’ हीच भूमिका हिताची असल्याची मांडणी बैठकीत उपस्थित नेत्यांनी केली. आजवर मुंबईत स्वबळावर निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. सर्व नेत्यांनी एकसंध होऊन काम केल्यास २००७ च्या निकालाची पुनरावृत्ती करता येऊ शकते. २००७ च्या निवडणुकीत काँग्रेसने ७५ जागांवर आपले नगरसेवक निवडून आणले होते. यंदा काँग्रेसचाच महापौर बसविण्याच्या इराद्याने ठोस रणनीती आखायला हवी, अशी भावना उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली. बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतर एच. के. पाटील यांनी पक्षाच्या सर्व समित्यांनी विशेषतः समन्वय समितीने पालिका निवडणुका गांभीर्याने घ्याव्यात.

पालिका, राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि मुंबई विभागीय काँग्रेसमध्ये निवडणुकीच्यादृष्टीने समन्वय हवा, अशी सूचना केली. पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबईत पक्षाला बळकटी देण्यासाठी जो कार्यक्रम ठरविण्यात आला होता, त्याचा मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आढावा घ्यावा आणि दहा दिवसात अहवाल सादर करावा. मुंबईसाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्या समित्या तयार केल्या, त्यांच्या नियमित बैठका घेण्याचेही ठरले.

या बैठकीस एच. के. पाटील यांच्यासह मुंबई अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, नसीम खान, अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, संदेश कोंडविलकर, भूषण पाटील यांच्यासमवेत तिन्ही केंद्रीय सचिव उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाMumbaiमुंबईbhai jagtapअशोक जगतापNaseem Khanनसीम खान