शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये नाराजी; 'अर्थ'पूर्ण मुद्द्यांवरून तक्रारी

By कुणाल गवाणकर | Published: November 18, 2020 5:59 PM

खात्यांना निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे मंत्री नाराज

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार प्रयत्न करूनही निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचं समजतं. काँग्रेसच्या खात्यांना निधी, पॅकेज मिळत नाहीत. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष फटका काँग्रेसला बसत असून जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचं काँग्रेसच्या मंत्र्याचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी याबद्दल स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागांना निधी मिळतो. पण काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना निधी, पॅकेज देण्यात येत नाही, अशी काँग्रेस मंत्र्यांची तक्रार आहे. आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. 'दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएसईबीलादेखील मिळायला हवं होतं,' असं वडेट्टीवार म्हणाले.परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे आहे. या खात्यासाठी दिवाळीआधी १ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मंत्रालयानं एसटी कामगारांचे तीन महिन्यांचे पगार काढले. तशाच पॅकेजची गरज ऊर्जा मंत्रालयालादेखील आहे. मात्र या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अप्रत्यक्षपणे काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 'ऊर्जा मंत्रालयाला पॅकेज मिळावं यासाठी अर्थ मंत्रालयाला ८ वेळा प्रस्ताव देण्यात आला. मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. राज्य सरकारच्या तिजोरीवर कोरोनामुळे ताण आहे. केंद्राकडून राज्याला कोणतीही मदत मिळालेली नाही,' असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.महाविकास आघाडी सरकारकडून जनतेचा विश्वासघात- फडणवीसमहाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देण्यात येईल असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यानंतरही जनतेला अवाजवी बिलं आली. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या घरातली सर्व उपकरणं २४ तास वापरल्या तरीही ५ वर्षे जितकं बिल येणार नाही, तितक्या रकमेचं बिल ३ महिन्यांसाठी आलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.राज्यातील ऊर्जा विभागासाठी दीड ते दोन हजार कोटींचा फटका फार मोठा नाही. याशिवाय केंद्र सरकार यासाठी कर्ज देण्यास तयार होतं. मात्र राज्य सरकारनं कर्ज घेतलं नाही. त्याचा फटका राज्यातल्या जनतेला बसत आहे. एसटी महामंडळाला निधी मिळाला ही चांगली गोष्ट आहे. पण वीज मंडळालादेखील पॅकेज मिळायला हवं होतं. कोरोना काळात इतर सर्व राज्यांनी विजबिलात सूट दिली आहे. पण महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका फडणवीसांनी केली. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNitin Rautनितीन राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस