नाशिक:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी नुकतेच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. श्रीनगर येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. पण, राहुल गांधी थांबले होते, तिथपासून केवळ ५०० मीटरवर बॉम्ब हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शंका उपस्थित केली आहे. राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना, असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला आहे. (congress nana patole alleged modi govt over rahul gandhi tour and jammu kashmir bomb blast)
स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 'व्यर्थ न हो बलिदान' हा कार्यक्रम हुतात्मा स्मारकात घेण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!
राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला
राहुल गांधी जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. तिथे ते गेले अन् बॉम्बस्फोट झाला. ते तिथून गेले होते म्हणून बरे झाले. राहुल गांधी जिथे थांबले होते तिथून ५०० मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. जम्मू काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असून तेथील सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. राहुल हे देशभरातील जनतेचा आवाज बनले असून, हा हल्ला म्हणजे त्यांना संपविण्याचा कट तर नाही ना, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.
“आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत
भाजपपासून काँग्रेसच देशाला वाचवू शकते
नोटाबंदी झाल्यावर दहशतवाद संपेल असं यांनी सांगितलं होतं. पण मग दहशतवाद संपला का? नोटाबंदीचं सोडून द्या पण मग तुमच्याकडे इतकी मोठी यंत्रणा असताना दहशतवादी राहुल गांधी होते तिथपर्यंत कसे काय येऊ शकले, अशी विचारणा करत गांधी घराणे देशाचा आवाज बनले असून लोकशाहीची मूल्ये आणि संविधानाची मोडतोड करणाऱ्या भाजपपासून काँग्रेसच देशाला वाचवू शकते, असे नाना पटोले म्हणाले.
Air India चा टॉवर ठाकरे सरकार विकत घेणार? कंपनीशी खरेदीबाबत चर्चा सुरू
दरम्यान, ब्रिटिश राजवटीत जालियनवाला बाग हत्याकांडात अनेकांचा बळी गेला. परंतु, कोरोना संकट काळात पवित्र गंगा नदीतून अनेक हिंदू बांधवांचे मृतदेह वाहून गेले. गंगा नदी मलिन करण्याचे काम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये मश्गूल होते. देशात चाललेले मृत्यूचे तांडव बघत होते. जालियनावाला बागमध्ये जेवढे लोक मारले गेले नाहीत तेवढे बळी करोना काळात केंद्र सरकारने घेतल्याचा आरोपही पटोले यांनी केला.