झोटिंग समिती फास होता, एकनाथ खडसेंना केवळ त्रास होता; नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:33 PM2021-07-13T17:33:13+5:302021-07-13T17:34:25+5:30
झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई: भाजपतून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. हा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, एकनाथ खडसेंना त्रास देण्यासाठी झोटिंग समितीचा फास केल्याची टीका केला आहे. (congress nana patole criticised devendra fadnavis over zoting committee for eknath khadse)
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांना एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांवर चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीचा अहवाल गायब झाल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
“कोण कौरव, कोण पांडव हे त्यांनीच ठरवावं”; पंकजा मुंडेंना काँग्रेसचा टोला
हा एक फास होता का?
देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फास होता का? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. तसेच भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा बहुजन विरोधी, OBC विरोधी पक्ष आहे, असल्याचा दावा करत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.
आगामी निवडणुकांसाठी RSS ची तयारी सुरू; आता मुस्लीम बहुल भागांतही सुरु करणार शाखा!
पक्षप्रमुख म्हणून बोलणे हे काम आहे
महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझे वाक्य तोडून मोडून दाखवले. मी काही चुकीचे बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणे हे काम आहे. कार्यकर्त्याचे गाऱ्हाणे ऐकणे माझे काम आहे, असे सांगत पण मला विरोध का होतो, हे माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल हा २०१७ मध्येच आला होता. मात्र, हा अहवाल समोर आणण्यात आला नाही. झोटिंग समितीवर ४५ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. तसेच एक वर्षाचा वेळ लागला होता. या समितीसमोर खडसे हजर राहिले होते. दुसरीकडे, एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत हा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती.