OBC Reservation: “RSS च्या इशाऱ्यावर मोदी सरकार आरक्षण संपविण्याचे काम करतेय”; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 07:08 PM2021-06-25T19:08:31+5:302021-06-25T19:11:20+5:30

OBC Reservation: आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

congress nana patole criticises modi govt and rss over maratha and obc reservation | OBC Reservation: “RSS च्या इशाऱ्यावर मोदी सरकार आरक्षण संपविण्याचे काम करतेय”; काँग्रेसचा आरोप

OBC Reservation: “RSS च्या इशाऱ्यावर मोदी सरकार आरक्षण संपविण्याचे काम करतेय”; काँग्रेसचा आरोप

Next
ठळक मुद्देशनिवार, २६ जून रोजी केंद्रातील भाजप सरकारविरोधात काँग्रेसच राज्यव्यापी आंदोलन आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देशकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे जोरदार टीकास्त्र

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवार २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. (congress nana patole criticises modi govt and rss over maratha and obc reservation)

“मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा”; भाजपची मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधी भाजप सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. यातच आता आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. 

Anil Deshmukh: “खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”: भाजप

फडणवीस आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलतात

देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

केंद्रातील मोदी सरकार जबाबदार

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. भाजपच्या या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शनिवार, २६ जून रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांत आणि तालुक्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड नियमांचे पालन करून आंदोलनात सहभागी होतील असे नाना पटोले म्हणाले.
 

Web Title: congress nana patole criticises modi govt and rss over maratha and obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.