“PM नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली”; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 06:55 PM2021-06-29T18:55:16+5:302021-06-29T18:58:08+5:30

बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या देवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole criticized pm modi and bjp over banjara reservation | “PM नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली”; नाना पटोलेंची टीका

“PM नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली”; नाना पटोलेंची टीका

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरणअध्यक्ष आत्मारामजी जाधव, मदनभाऊ जाधव यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशनाना पटोलेंची पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार टीका

मुंबई: भारतीय जनता पक्षाने धनगर, मराठा समाजाची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक बंजारा समाजाचीही केली आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो, असे लेखी आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत त्यांनी तो शब्द पाळला नाही. बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या देवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. (congress nana patole criticized pm modi and bjp over banjara reservation)

नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, देवानंद पवार, डॉ. गजानन देसाई, रामकिशन ओझा, वाल्मीक पवार, लक्ष्मणराव भुरे,एनएसयुआयचे अमीर शेख आदी उपस्थित होते.

२ फूट उंचीची मूर्ती, विसर्जनही घरच्या घरी; वाचा, गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली

बंजारा समाज हा देशहितासाठी काम करणारा समाज

बंजारा टायगर फोर्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून नाना पटोले म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी राज्यात ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करून राज्याला प्रकाशात आणले. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती झाली. बंजारा समाजाने राज्याला दिशा दाखवून दिली. बंजारा समाज हा आत्मसन्मासाठी लढणारा, देशहितासाठी काम करणारा समाज आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस पक्षात विलीन झाली. टायगरला इलाका नसतो आणि पंजा फक्त टायगरकडे असतो आणि आता टायगर (वाघ) काँग्रेसमय झाला आहे, असा मिश्किल टोला पटोले यांनी लगावला.

“अनिल देशमुखांना ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवायला लागलं”
   
दरम्यान, यावेळी बोलताना आ. राजेश राठोड व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी बंजारा टायगर फोर्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. बंजारा टायगर फोर्सच्या काँग्रेस पक्षातील विलीनीकरणामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. भाजपचा खरा चेहरा आता बंजारा समाजासमोर आला असून बंजारा समाज भाजपला थारा देणार नाही असे ते म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत फक्त काँग्रेस पक्षच बंजारा समाजाला न्याय देऊ शकतो त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून यापुढे काँग्रेस विचारांवर वाटचाल करू व राज्यभरात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करू असे आत्मारामजी जाधव व मदनभाऊ जाधव म्हणाले.

Web Title: congress nana patole criticized pm modi and bjp over banjara reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.