मुंबई: मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व पाईप गॅसचे दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस पक्ष या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत असून, गुरुवार १५ जुलै रोजी राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. (congress nana patole says we will meet governor over fuel price hike and inflation in the state)
“२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार!”
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. जगणे मुश्कील केलेल्या या सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. ७ जुलैपासून राज्यात विविध आंदोलने करून मोदी सरकारच्या या अन्यायी महागाईविरोधात आवाज उठवला आहे. उद्या हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहे. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेल्या मोदी सरकारने जागे होऊन जनतेला दिलासा द्यावा यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.
देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १
२०२४ मध्ये काँग्रेसची सत्ता केंद्रात स्थापन होईल
२०२४ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल. देशामध्ये भाजपला सशक्त पर्याय फक्त काँग्रेस आहे. केंद्रातील मोदी सरकारने देश विकायला काढला आहे. लोकांचे जगणे मुश्किल केले आहे. कोरोना परवडला, परंतु महागाई परवडत नाही, अशी जनभावना तयार होऊ लागली आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपतील अनेक बहुजन नेत्यांचे खच्चीकरण केले, हे सर्वांनाच माहिती आहे. खडसेंचे तर राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. झोटिंग समितीचा अहवाल अद्याप वाचला नाही. परंतु, तो पुढे येईल, तेव्हा त्यातील फार्स कळून येतील. मागील सरकारच्या काळातील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन मंत्री गोत्यात येतील, असा दावा नाना पटोले केला आहे.