कोलकाता : काँग्रेसविषयी आदर असला तरी उत्तर प्रदेशातील राजकीय गणिते नीट जुळवण्यासाठी त्या पक्षाला दूर ठेवून सपा व बसपाने आघाडी केल्याचे प्रतिपादन समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी येथे केले. ते म्हणाले की, काँग्रेसशी माझे उत्तम संबंध आहेत. पुढचा पंतप्रधान उत्तर प्रदेशातला असला तर ती निश्चितच आनंदाची गोष्ट असेल. लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसचे सहकार्य घेणार की नाही याचे उत्तर मी योग्य वेळी देईन. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली आहे. देशाला आता नवीन पंतप्रधान हवा आहे व निवडणुकांनंतर ती इच्छा नक्की पूर्ण होईल.सपा-बसपाने आघाडीत न घेतल्याने उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० जागा काँग्रेसने स्वबळावर लढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे नुकसान होणार नाही का असे विचारता अखिलेश म्हणाले की, आमची सत्ताधाºयांविरोधात एकजूट अधिक मजबूत झाली आहे. परस्परांशी असलेले उत्तम संबंध हा वेगळा मुद्दा आहे. भाजपाला हरविणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. >शिवपाल करणार काँग्रेसबरोबर बोलणीसमाजवादी पक्षातून बाहेर पडलेले व प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया)चे अध्यक्ष शिवपाल यादव म्हणाले की, आम्ही राज्यात काँग्रेस व अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांशी जागावाटपाची चर्चा करणार आहोत. ते अखिलेश यादव यांचे काका आहेत. प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया) पक्षाला किल्ली हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
गणित जुळवण्यासाठी आघाडीत काँग्रेस नाही, अखिलेश यादव यांनी दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 6:28 AM