“RSS वाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:31 PM2021-06-17T16:31:43+5:302021-06-17T16:33:25+5:30

RSS: काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली असून, अद्यापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का झाली नाही, अशी विचारणा केली आहे.

congress pawan khera asked about accountability of rss and why is not registered till now | “RSS वाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल

“RSS वाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे RSS वर टीकास्त्रसंघ टॅक्स भरत नसल्याबाबत उपस्थित केले सवाल

नवी दिल्ली: गेल्या काही दिवासांपासून अयोध्येतील जमिनीच्या प्रकरणावरून राजकारण तापताना दिसत आहे. विरोधी काँग्रेससह अन्य पक्ष भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संबंधित संस्था, संघटनांवर टीका करत आहेत. यातच आता काँग्रेसनेराष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली असून, अद्यापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का झाली नाही, अशी विचारणा केली आहे. (congress pawan khera asked about accountability of rss and why is not registered till now)  

राम मंदिराच्या देणग्यांवरून यापूर्वीही काँग्रेसने टीका केली होती. आता अयोध्येतील जमिनीच्या प्रकरणावरून काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंकेवक संघावर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी राजकारणाचा मोठा भाग असूनही स्वयंसेवक संघाची नोंदणी का झालेली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. 

देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार; राकेश टिकैत यांचा एल्गार

RSS टॅक्स का भरत नाही

राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या स्थापनेला ९५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही अद्याप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का नाही झाली? ही संघटना इन्कम टॅक्स का भरत नाही? ते या देशाचे मालक आहेत का? गेल्या तीन पीढ्यांना मूर्ख बनवण्याचे काम संघवाले करतायत. मात्र, सुदैवाने त्यांना यात यश आलेले नाही. कारण या तीनही पिढ्या हुशार होत्या, अशी टीका पवन खेडा यांनी केली आहे. 

“माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेतला, हा लढा मोठा आहे”: चिराग पासवान

संघाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप

पवन खेडा यांनी काल उत्तरप्रदेश आणि राजस्थानमधल्या जमिनींच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांची उदाहरणे दिली. एक प्रकरण म्हणजे उत्तर प्रदेशामधील अयोध्येत राम जन्मभूमी संस्थानाने खरेदी केलेल्या मंदिरासाठीच्या जमिनीचे असून, या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय आणि संघाचे कार्यकर्ते अनिल मिश्रा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. दुसरीकडे, राजस्थानमधील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत. एका खासगी कंपनीला नगरपालिकेकडून थकबाकी मिळवून देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे कमिशन मागितल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 
 

Web Title: congress pawan khera asked about accountability of rss and why is not registered till now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.