नवी दिल्ली:राफेल डीलमध्ये (Rafale Deal) झालेले भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून, चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावरून पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली असून, राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान दिले आहे. (congress pawan khera challenge that pm modi should take press conference on rafale deal)
देशाच्या सुरक्षेतून मोदी सरकारने आपल्या मित्रांची तुंबडी भरली. राफेल सौद्याच्या चौकशीसाठी फ्रान्सने न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. पण गेल्या २४ तासांत भारत सरकारकडून याप्रकरणी कुठलीही प्रतिक्रया का आली नाही, अशी विचारणा काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदींनी राफेलच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्यावी, अशी मागणी केली आहे.
“फडणवीसांनी तेव्हा माझं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते”; केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान
पत्रकार परिषदेतून सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत
पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर राफेल सौद्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोपांना आणि त्यासंबंधी प्रश्नांना उत्तरं द्यावीत. राफेलच्या चौकशीवरून संपूर्ण मोदी सरकार गप्प का, राफेल करारात ज्या देशाला फायदा झाला आहे, त्या फ्रान्समध्ये चौकशी सुरू आहे. पण ज्या देशाच्या नागरिकांच्या कराचा पैसा लुटला आहे, त्या देशात चौकशी होत नाही. राफेल डीलमध्ये मध्यस्थाला कोट्यवधीची भेट दिली गेली, हे कागदपत्रांवरून उघड होत आहे, अशी टीका खेडा यांनी केली.
भारतीय रेल्वेची बक्कळ कमाई; एका महिन्यात मालवाहतुकीतून ११ हजार कोटींची मिळकत
मोदी सरकारने ३६ विमाने का केली?
राफेल हे एक सर्वोत्तम लढाऊ विमान आहे. त्यामुळेच तत्कालीन यूपीए सरकारने या लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले होते. पण त्यावेळी विमानाची किंमत ५७० कोटी होती. पण मोदी सरकारने ती वाढवून १,६७० कोटी केली. यूपीए सरकार १२६ विमाने खरेदी करणार होते. पण मोदी सरकारने तर ही संख्या कमी करून फक्त ३६ विमाने का केली, असा सवालही खेडांनी केला.
“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
चोर की दाढी…
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. राहुल यांनी अप्रत्यक्षपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला आहे. "चोर की दाढी…" एवढे तीन शब्द ट्वीट केले आहेत. तसेच या ट्वीटमध्ये RafaleScam असा हॅशटॅग देखील वापरला आहे. यासंदर्भात फ्रान्सचे माजी पंतप्रधान फ्रांस्वा ओलांद हे राफेल डीलवर हस्ताक्षर करताना पदावर होते. आताचे पंतप्रधान इमैनुएल मैक्रॉन हे तेव्हा अर्थ मंत्री होते. या दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. तत्कालीन संरक्षण मंत्री आणि सध्याचे परराष्ट्र मंत्री जीन-यवेस ले ड्रियान यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. राफेल बनविणारी कंपनी दसॉल्ट एव्हिएशनकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.