नवी दिल्ली – काँग्रेसने पुन्हा एकदा पीएम केअर्स फंडवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. बुधवारी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय दूतावासाकडून आलेल्या देणगीदारांच्या पावतीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन या प्रश्नांची यादी मांडली आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर परदेशी देणग्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, चीन, पाकिस्तान आणि कतारवरुन पीएम केअर्स फंडात परदेशी देणग्या आल्या आहेत. या अनेक प्रश्न मला पडले आहेत. जवळपास १० प्रश्नांची यादी रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजपा आणि केंद्र सरकारला विचारले आहेत.
पीएम केअर्स फंडात आलेल्या देणग्यांवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले हे १० प्रश्न
- पीएम केअर्स फंडासाठी भारतीय दूतांनी प्रसिद्धी आणि देणगी का मागितली?
- प्रतिबंधित चिनी अॅप्सवर निधीची जाहिरात का केली गेली?
- पाकिस्तानकडून किती पैसे आले आणि कोणी दिले?
- कतारमधील कोणत्या दोन कंपन्यांनी पीएम केअर फंडमध्ये देणगी दिली आणि किती कोटी रुपये मिळाले?
- पीएम केअर्स फंडमध्ये २७ देशांकडून किती हजारो कोटी रुपये आले?
- देणगी देण्याचा आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यामध्ये NISSEI ASB शी काही संबंध आहे काय?
- आरटीआयतंर्गत सार्वजनिक अधिकार नसताना २७ भारतीय दूतांनी सार्वजनिक मंचाऐवजी क्लोल्ड वाहिनीद्वारे याची जाहिरात का केली?
- सरकारच्या एफसीआरएच्या पुनरावलोकनातून हा निधी वगळण्यात का आला आहे?
- पंतप्रधान केअर्स फंड हा सार्वजनिक प्राधिकरण का नाही?
- कॅग आणि भारत सरकारकडून या निधीचे ऑडिट का होऊ शकत नाही आणि परदेशी देणग्यांबाबत अहवाल का जाहीर केला जात नाही?