"...म्हणून कोरोना काळात देशात अधिक मृत्यू झाले"; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:02 PM2021-07-21T13:02:40+5:302021-07-21T13:06:02+5:30

Congress Priyanka Gandhi And Modi Government : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

Congress Priyanka Gandhi attack on center for statement that there is no death due to lack of oxygen in corona | "...म्हणून कोरोना काळात देशात अधिक मृत्यू झाले"; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

"...म्हणून कोरोना काळात देशात अधिक मृत्यू झाले"; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Next

कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Virus Second Wave) देशात विविध ठिकाणी ऑक्सिजनच्या (Oxygen) कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. पण केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) राज्यसभेत (Rajya Sabha) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचा दावा केला. काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता. यावर आरोग्य मंत्रालयाकडून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

ऑक्सिजनवरून देशात सध्या राजकारण तापलं असून प्रियंका गांधींनी मोदी सरकारला चांगलंच सुनावलं आहे. कोरोना काळात देशात अधिक मृत्यू का झाले याचं कारण सांगत गंभीर आरोप केला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कोरोना संकटाच्या काळात सरकारने ऑक्सिजनच्या निर्यातीत ७००% वाढ केली. त्यामुळे मृत्यू झाले. तसेच ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी सरकारने टँकरची व्यवस्था केली नव्हती. सशक्त गट आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष करून ऑक्सिजन देण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याबाबत कोणतीही सक्रियता दाखवली नाही" असं प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची नियमितपणे माहिती राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला देण्यात आलेली आहे. पण कोणत्याही राज्याने किंवा केंद्र शासित प्रदेशानं ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिलेली नाही", असं उत्तर नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याचं मात्र आरोग्य मंत्रालयानं मान्य केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. 

'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकही मृत्यू झालेला नाही'; नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत विधान

पहिल्या लाटेत ३,०९५ मेट्रीक टन ऑक्सिजनची मागणी होती. तर दुसऱ्या लाटेत यात दुपटीनं वाढ होऊन ९ हजार मेट्रीक टनपर्यंत पोहोचली, अशी माहिती सरकारनं संसदेत दिली. दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत १०,२५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला आहे. सर्वाधिक १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना पुरविण्यात आला, तर दिल्लीला ४०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला अशीही माहिती केंद्रानं संसदेत दिली आहे. 

Web Title: Congress Priyanka Gandhi attack on center for statement that there is no death due to lack of oxygen in corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.