CoronaVirus News : "लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही"; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:26 PM2021-05-12T15:26:48+5:302021-05-12T15:41:18+5:30
Congress Priyanka Gandhi Slams Narendra Modi : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांत पहिल्यांदाच कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. याआधी 7 मे रोजी कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तब्बल 4205 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र असं असताना काही ठिकाणी लसीचा तुडवडा निर्माण झाला आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. कोरोना लसीकरणावरून निशाणा साधला आहे. "लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही" असं म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहेत. "भारत सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजपा सरकारने 12 एप्रिल रोजी लसीकरण 'उत्सव' साजरा केला. परंतु, कोरोना लसीची कोणतीच व्यवस्था केली नाही आणि या 30 दिवसांत आमच्या देशातील लसीकरण 82 टक्क्यांनी कमी झाले" असं प्रियांका (यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
जनवरी 2021 में क्यों किया?
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 12, 2021
अमरीका और अन्य देशों ने हिंदुस्तानी वैक्सीन कंपनियों को बहुत पहले ऑर्डर दे रखा था। इसकी जिम्मेदारी कौन लेगा?
घर-घर वैक्सीन पहुंचाए बिना कोरोना से लड़ना असम्भव है। 2/2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) कोरोना लस तयार करणाऱ्या कंपन्यांकडे गेले, फोटो काढले पण त्यांच्या सरकारने पहिल्या लसीचा आदेश जानेवारी 2021 मध्ये का दिला? अमेरिका आणि इतर देशांनी लस तयार करणाऱ्या भारतीय कंपन्यांना खूप पूर्वीच ऑर्डर्स दिल्या होत्या. याची जबाबदारी कोण घेणार? घराघरात लस पोहोचवल्याशिवाय कोरोनाची लढाई असंभव आहे" असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियंका यांनी याआधी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करत पंतप्रधान मोदींसाठी नवीन घर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी एवढा पैसा रूग्णांवर खर्च केला तर बरं होईल असं म्हटलं होतं.
CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! मोठ्या संख्येने प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/7rXq9Vso9b
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2021
मोदी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल असं म्हणत जोरदार टीका केली होती. तसेच "देशातील लोक जेव्हा ऑक्सिजन, लस, रुग्णालयातील बेड, औषधे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशावेळी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल. अशा प्रकारच्या खर्चांमुळे अशा प्रकारच्या खर्चामुळे सरकारची प्राथमिकता ही अन्य गोष्टींसाठी आहे असा संदेश लोकांमध्ये जातो" असं प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
CoronaVirus Live Updates : "भाजपाला काय वाटतं की जनतेला आपल्या डोळ्यांसमोर होणाऱ्या मृत्यूचं सत्य दिसत नाही का?"#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#AkhileshYadav#BJP#ModiGovthttps://t.co/WhV7VCfXOjpic.twitter.com/9xUhzaSBRG
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2021