"मोदींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष, आता झोळी घेऊन निघून जाण्याची आलीय वेळ" 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 05:26 PM2021-06-24T17:26:59+5:302021-06-24T17:29:53+5:30

Congress Ragini Nayak And PM Narendra Modi : काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 

Congress Ragini Nayak says country is not taking care of prime minister narendra modi | "मोदींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष, आता झोळी घेऊन निघून जाण्याची आलीय वेळ" 

"मोदींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष, आता झोळी घेऊन निघून जाण्याची आलीय वेळ" 

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,069 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,321 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,91,981 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, लसीकरण यावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अनेकांनी विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका सध्या चर्चेचा विषय झाला आहे. याच विषयावर एका वाहिनीने घेतलेल्या चर्चासत्रादरम्यान काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. 

"मोदींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष, आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे " असा सणसणीत टोला काँग्रेसने मोदी सरकारला लगावला आहे. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल असा प्रश्न या चर्चेदरम्यान विचारला असता त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक (Ragini Nayak) यांनी उत्तर दिलं आहे यावेळी "मोदीजींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष अशी अवस्था भारतीय जनता पार्टीची झाली आहे. भाजपाशासित भागांमध्ये गोंधळ माजला आहे. मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता. असं वाटतंय की आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे" असं नायक यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेसच्या रागिणी नायक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील याबाबत एक ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशमधील राजकीय गोंधळावर भाष्य केलं आहे. "योगी आणि मोदी दोघेही एकमेकांवर वरचढ ठरू पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं एकमेकांशी पटेना. भाजपाशासित राज्यांमध्ये नुसता गोंधळ माजला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्व एकमेकांवर वरचढ ठरू पाहत आहेत. कोरोना असो नाहीतर सत्ता दोन्हीही मोदीजींच्या हाताबाहेर जाऊ लागलेत. आता असं वाटतंय की बहुतेक झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आलेली आहे" असं देखील रागिणी नायक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"भाजपात जाणं ही खूप मोठी चूक"; मुंडण आणि शुद्धीकरण करून 200 कार्यकर्त्यांचा TMC मध्ये प्रवेश 

विधानसभा निवडणुकांनंतर बंगालचं राजकारण ढवळून निघालं. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आहे. याच दरम्यान हुगळी जिल्ह्यात जवळपास 200 कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घटना घडली आहे. कार्यकर्त्यांनी गंगाजलने आपलं शुद्धीकरण करुन घेतलं. भाजपामध्ये प्रवेश करणं आपली खूप मोठी चूक होती असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तसेच त्यांना आपल्या या चुकीसाठी मुंडण करुन घेत आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुगळी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचा झेंडा हाती घेतला आणि स्थानिक खासदारांना पाठिंबा दर्शवला आहे.

Web Title: Congress Ragini Nayak says country is not taking care of prime minister narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.