नवी दिल्ली - कोरोना व्हायरस, देशातील परिस्थिती, भारत-चीन तणाव, अर्थव्यवस्था, कृषि विधेयके यासह विविध मुद्दयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने निर्माण केलेले व वाढवलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले असा आरोप आता राहुल यांनी केला आहे.
"मोदींनी गेल्या अनेक दशकांमध्ये काँग्रेसने (अनेक देशांबरोबर) निर्माण केलेले चांगले संबंध संपुष्टात आणलेत. आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक आहे" असं एक ट्विट केलं आहे. यासोबतच भारताचे बांगलादेशसोबत बिघडत असलेले संबंध आणि त्यांची चीनशी वाढत असलेली जवळीक यासंबंधीत असलेल्या एका बातमीचा फोटोही पोस्ट केला आहे. राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर निशाणा साधला होता. ''मोदींनी शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास केला'' अशी जोरदार टीका केली होती.
पंतप्रधानांना राहुल गांधी यांनी त्यांच्या काही आश्वासनांची आठवण करून दिली आहे. "2014 - मोदीजींचे निवडणुकीचे आश्वासन स्वामीनाथन आयोगाचा MSP, 2015 - मोदी सरकारने न्यायालयात सांगितले की हे त्यांच्याकडून होणार नाही, 2020 - काळा शेतकरी कायदा. मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास" असं राहुल गांधी यांनी याआधी म्हटलं आहे.
"लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच, आधी आवाज दाबला आणि आता...", राहुल गांधी संतापले
राहुल गांधी यांनी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं असल्याची जोरदार टीका केली आहे. "लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच आहे. सुरुवातीला आवाज दाबला गेला. त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली. या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...
"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप
"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा", आठवलेंचं मोदींना पत्र