नवी दिल्ली - संसदेने कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी संमत केलेली विधेयके ही 21 व्या शतकाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आले आहे. गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ''मोदींनी शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास केला'' अशी जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. पंतप्रधानांना त्यांच्या काही आश्वासनांची आठवण करून दिली आहे. "2014 - मोदीजींचे निवडणुकीचे आश्वासन स्वामीनाथन आयोगाचा MSP, 2015 - मोदी सरकारने न्यायालयात सांगितले की हे त्यांच्याकडून होणार नाही, 2020 - काळा शेतकरी कायदा. मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच, आधी आवाज दाबला आणि आता...", राहुल गांधी संतापले
राहुल गांधी यांनी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं असल्याची जोरदार टीका केली आहे. "लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच आहे. सुरुवातीला आवाज दाबला गेला. त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली. या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय"
विधेयकावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कृषी विधेयकाच्या रुपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचं फर्मान काढत असल्याची टीका करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. "जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
खासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...
काय सांगता? ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत
अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध
"देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले"
"लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच, आधी आवाज दाबला आणि आता...", राहुल गांधी संतापले