नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 48 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 48,46,428 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 79,722 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात कोरोनाच्या वाढत्या प्रसारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
"अनियोजित लॉकडाऊन ही एका अहंकारी व्यक्तीची देण आहे. ज्यामुळे कोरोना देशभरात पसरला. आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "कोरोनाची रुग्णसंख्या या आठवड्यात 50 लाख आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 10 लाखांच्या पुढे जाईल. अनियोजित लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराची देण आहे, ज्यामुळे कोरोना देशभर पसरला. मोदी सरकारने आत्मनिर्भर व्हा असं सांगितलं आहे. म्हणजेच स्वतःचा जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात
काही दिवसांपूर्वी "मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं" असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. राहुल गांधी यांनी काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या स्पिक अप मोहिमेत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशातील करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं म्हटलं. "अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटीत क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. 21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन दिलं होतं पण कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग संपवण्यात आले" असं ही राहुल यांनी म्हटलं होतं.
"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"
"कोरोनाच्या नावावर जे केलं, ते असंघटीत क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. छोट्या आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. जेव्हा कोणतीही सूचना न देता लॉकडाऊन केलं तेव्हा ते यांच्यावरील आक्रमण होतं.पंतप्रधानांनी 21 दिवसांची लढाई असेल असं सांगितलं होतं पण असंघटीत क्षेत्राचा 21 दिवसांत कणाच तुटला. लॉकडाऊननंतर तो उठवण्याची वेळ आली. या काळात काँग्रेसने एक नाही, तर अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल. थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण तसं नाही केलं."
महत्त्वाच्या बातम्या
"कोरोना किट खरेदीमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार", आपचा योगी सरकारवर हल्लाबोल
CoronaVirus News : अरे व्वा! 105 वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात
"देशात भीतीचं वातावरण, संसदेत 'या' मुद्द्यांवर चर्चा होणं आवश्यक"
"ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल