Bihar Election 2020 : "डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 03:30 PM2020-11-01T15:30:19+5:302020-11-01T15:43:01+5:30

Bihar Election 2020 Randeep Singh Surjewala And Narendra Modi : रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.

congress randeep singh surjewala attacks narendra modi over double engine government | Bihar Election 2020 : "डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज"

Bihar Election 2020 : "डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज"

Next

पाटणा - विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव झंझावाती प्रचारसभा घेत आहेत. राज्यभरात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. "बिहारमध्ये डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज आहे" असं म्हटलं आहे.

सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "मोदीजी, 2015 मधील निवडणुकीत नितीश कुमार यांना 18 व्या शतकातील मानसिकतेचे म्हणाले होते. आज त्यांना छपरा येथे डबल इंजिन म्हणत आहेत. मात्र सत्य हे आहे की, हे डबल धोक्याचे सरकार आहे. एक घोटाळेबाज आणि एक धोकेबाज, बिहारची जनता करणार दोघांचा उपचार!" असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच बोले बिहार बदलें सरकार हा हॅशटॅगही वापरला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छपरा येथील सभेत लालू-राबडी शासनकाळातील आठवण करून देत लोकांना म्हटलं की "तेव्हा बिहारमध्ये विकास होत नव्हता. कंत्राट निघाले तरी देखील अभियंता आणि ठेकेदार कामं करत नव्हते. कारण, त्यांच्याकडून अगोदर खंडणी मागितली जात होती. यामुळे कुणीच काम करत नव्हतं तसेच, आता राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे व राज्यात विकासाची चाकं धावत आहेत."  तसेच मोदींनी तेजस्वी यादव व राहुल गांधींवरही निशाणा साधला. 

"उत्तर प्रदेशमध्ये हरणाऱ्या युवराजने आता जंगलराजमधील युवराजाशी हात मिळवला"

"बिहारमध्ये एकीकडे डबल इंजिनचे सरकार आहे, तर दुसरीकडे डबल युवराज आहेत. त्यातील एक जंगलराजचे युवराज आहे. उत्तर प्रदेशमध्ये हरणाऱ्या युवराजने आता जंगलराजमधील युवराजाशी हात मिळवला आहे. त्यांना केवळ कुटुंबाची चिंता आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झालं आहे" असं देखील मोदींनी म्हटलं आहे. त्यावरून काँग्रेसने आता भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तर दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पाटणा आणि गोपालगंजमधील निवडणूक सभांना संबोधित केलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Bihar Election 2020 : "सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल"

"सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल" असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा भाजपावर यावरून टीका केली होती. त्यामुळे आता राजनाथ सिंह यांनी हल्लाबोल केला आहे. "काँग्रेससह काही राजकीय पक्ष देशाच्या सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. चीनने भारताची 1200 चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली असं काँग्रेस म्हणत आहे. पण आपण जर सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच "तुम्ही सुशिक्षित नागरिक आहात. 1962 ते 2013 दरम्यानचा इतिहास बघा. आपल्या सैन्यातील जवानांनी जे शौर्य दाखवले आहे त्याने अभिमानाने मान उंचावते. संरक्षणमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो" असं देखील म्हटलं आहे. 

Web Title: congress randeep singh surjewala attacks narendra modi over double engine government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.