"देशाला जाणून घ्यायचं आहे, 'राजधर्म' मोठा की 'राजहट्ट?'"; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:47 PM2020-12-12T17:47:46+5:302020-12-12T18:00:51+5:30
Congress Randeep Singh Surjewala over Farmers Protest : दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी आणि काँग्रेसने पाठिंबा दिला असून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. नव्या कृषी कायद्यांवरुन दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी आणि काँग्रेसने पाठिंबा दिला असून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान काँग्रेसने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आंदोलनात 17 दिवसांमध्ये 11 शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागलं आहे मात्र तरी देखील मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नसल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "गेल्या 17 दिवसांमध्ये 11 शेतकरी बांधवांच्या बलिदानानंतरही निरंकुश मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही. ते अजूनही अन्नदात्यांबरोबर नाहीतर धनदात्यांबरोबरच का आहेत? देशाला जाणून घ्यायचं आहे की "राजधर्म" मोठा की "राजहट्ट"?" असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून ट्विटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधानांना लक्ष्य करत आहेत.
पिछले 17 दिनों में 11 किसान भाईयों की शहादत के बावजूद निरंकुश मोदी सरकार का दिल नहीं पसीज रहा।
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) December 12, 2020
वह अब भी अन्नदाताओं नहीं, अपने धनदाताओं के साथ क्यों खड़ी है?
देश जानना चाहता है-“राजधर्म” बड़ा है या “राजहठ” ?#किसान_आंदोलन#FarmersProtestspic.twitter.com/izzO3OPgEP
"कृषी कायदे हटवण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल"
शेतकरी आंदोलनावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. "आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल" असा संतप्त सवाल करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
Farmers Protest : कृषी कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान 11 शेतकऱ्यांनी गमावला जीव, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/VNLoErLpsh#RahulGandhi#Congress#FarmersProtests#FarmBills2020pic.twitter.com/79oAKoTmso
— Lokmat (@MiLOKMAT) December 12, 2020
"कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावं लागेल?" असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 11 शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये एका बातमीचा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये तन्ना सिंह, जनकराज, गजन सिंह, गुरजंट सिंह, लखबीर सिंह, सुरेंद्र सिंह, मेवा सिंह, राममेहर, अजय कुमार, किताब सिंह आणि कृष्ण लाल गुप्ता यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
Farmers Protest : कौतुकास्पद! शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचं केलं वाटप https://t.co/ya9bGSiNd9#FarmersProtest#FarmBills2020#FarmLaws
— Lokmat (@MiLOKMAT) December 12, 2020