"कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत"; काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 04:12 PM2021-05-12T16:12:58+5:302021-05-12T16:17:00+5:30

Congress Randeep Singh Surjewala Slams Yogi Adityanath : काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Congress Randeep Singh Surjewala Slams Yogi Adityanath Over Corona Situation in Uttarpradesh | "कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत"; काँग्रेसचा घणाघात

"कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत"; काँग्रेसचा घणाघात

Next

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाला भाजपाचे अनेक खासदार आणि आमदार पत्र लिहून नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेशभाजपामध्ये सर्व काही ठीक नसल्याचंच यातून समोर येतं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच या दाव्याची पोलखोल केली आहे. याच दरम्यान आता काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत" असं म्हणत काँग्रेसने घणाघात केला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत. कचऱ्याच्या गाड्यांमधून मृतदेह वाहून नेले जात आहेत. मृतदेह नदीत फेकले जात आहे असं असतानाही योगीजी तुम्ही सर्वकाही ठीक असल्याचं सांगत आहात. संत आणि महंत स्वप्नातही खोटं बोलत नाहीत असं म्हणतात. मात्र तुम्ही सर्वकाही ठीक आहे, असा खोटा दावा करुन, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय" असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. 

सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटसोबत एका बातमीची लिंक पोस्ट केली आहे. या बातमीमध्ये उत्तर प्रदेशमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो दाखवून राज्यातील कोरोना परिस्थिती किती गंभीर आहे. यासंदर्भातील भाष्य करण्यात आलं आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. कोरोना लसीकरणावरून निशाणा साधला आहे. "लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही" असं म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहेत. 

"लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही"; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या 

"भारत सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजपा सरकारने 12 एप्रिल रोजी लसीकरण 'उत्सव' साजरा केला. परंतु, कोरोना लसीची कोणतीच व्यवस्था केली नाही आणि या 30 दिवसांत आमच्या देशातील लसीकरण 82 टक्क्यांनी कमी झाले" असं प्रियांका (यांनी ट्विट करून म्हटलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) कोरोना लस तयार करणाऱ्या कंपन्यांकडे गेले, फोटो काढले पण त्यांच्या सरकारने पहिल्या लसीचा आदेश जानेवारी 2021 मध्ये का दिला? अमेरिका आणि इतर देशांनी लस तयार करणाऱ्या भारतीय कंपन्यांना खूप पूर्वीच ऑर्डर्स दिल्या होत्या. याची जबाबदारी कोण घेणार? घराघरात लस पोहोचवल्याशिवाय कोरोनाची लढाई असंभव आहे" असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियंका यांनी याआधी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करत पंतप्रधान मोदींसाठी नवीन घर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी एवढा पैसा रूग्णांवर खर्च केला तर बरं होईल असं म्हटलं होतं. 

Web Title: Congress Randeep Singh Surjewala Slams Yogi Adityanath Over Corona Situation in Uttarpradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.