Ram Mandir: “भाजप आणि RSS ने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 09:30 PM2021-06-15T21:30:13+5:302021-06-15T21:35:44+5:30

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

congress sachin sawant criticised bjp and rss over ram mandir land issue | Ram Mandir: “भाजप आणि RSS ने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

Ram Mandir: “भाजप आणि RSS ने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

Next
ठळक मुद्देराम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेतश्रीरामाच्या नावावर पैसा वसुलीचा धंदा सुरू असल्याचा काँग्रेसचा मोठा आरोपराम मंदिरासाठी पैसे दिलेल्या लोकांचा विश्वासघात - काँग्रेसची टीका

मुंबई: अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राम मंदिरासाठी घेण्यात आलेल्या किमतीच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS यांनी श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवला आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. (congress sachin sawant criticised bjp and rss over ram mandir land issue) 

श्रीरामांचे खरे भक्त असं करु शकतात, हे मान्यच नाही; ‘त्या’ घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटांतच १८.५ कोटींची कशी झाली? भाजप व संघानं मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलेला आहे, या शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे परंतु रामाच्या नावावर चाललेला हा बाजार लांछनास्पद आहे. हा प्रकार रामभक्तांचा अपमान करणारा असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. 

संघ परिवाराने राम मंदिरासाठी याआधी निधी गोळा केला

संघ परिवाराने राम मंदिरासाठी याआधीही निधी गोळा केला होता. त्याचे काय झाले याची माहिती अद्याप त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर मंदिरासाठी जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेनेही २०१५ साली हाच आरोप केला होता. त्याशिवाय, काही क्विंटल सोने लुबाडल्याचा आरोपही विश्व हिंदू परिषदेवर झाला होता. त्याचेही उत्तर अद्याप संघ परिवाराने दिले नाही. याद्वारे जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आम्ही जानेवारीमध्येच व्यक्त केली होती, असे सचिन सावंत म्हणाले. 

निषेध करणं मूलभूत अधिकार, दहशतवादी कृत्य म्हणू शकत नाही; हायकोर्टाने केंद्राला सुनावले

रामाच्या नावावर पैसा वसुलीचा धंदा

मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून पैसा वसुलीचा धंदा सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही अनेकदा निदर्शनास आणून दिले आहे. परंतु धर्माचे ठेकेदार आपणच असल्याच्या अविर्भावात रामाच्या नावाने खुलेआमपणे पैसे कमावून लोकांच्या श्रद्धेशी खेळ चालवला आहे. बाबा हरिदास यांची मूळ जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी दोन कोटी रुपयांना विकत घेतली आणि तीच जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला १८.५ कोटी रुपयात विकण्यात आली. हा व्यवहार फक्त काही मिनिटांत झाला. एवढ्या कमी वेळात एका जमिनीचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे काय वाढू शकतात?, अशी विचारणा सचिन सावंत यांनी केली असून, या व्यवहारासाठी एवढा मोठा मोबदला देऊन राम मंदिरासाठी पैसे दिलेल्या लोकांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला. 
 

Web Title: congress sachin sawant criticised bjp and rss over ram mandir land issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.