...म्हणून काँग्रेस नेता म्हणतो, पंतप्रधान नक्कीच निर्णय घेतील; मोदी है तो मुमकीन है

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 12:44 PM2021-06-08T12:44:42+5:302021-06-08T12:59:45+5:30

Congress Sachin Sawant And Narendra Modi : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

Congress Sachin Sawant Says modi hai to mumkin hai Over Maratha Reservation | ...म्हणून काँग्रेस नेता म्हणतो, पंतप्रधान नक्कीच निर्णय घेतील; मोदी है तो मुमकीन है

...म्हणून काँग्रेस नेता म्हणतो, पंतप्रधान नक्कीच निर्णय घेतील; मोदी है तो मुमकीन है

Next

मुंबई - मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व बांधकाममंत्री अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असा निर्णय दिला आहे; पण केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला ही मर्यादा ओलांडता येईल, अशी तरतूद केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मोदींची भेट घेतली आहे. 

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हटलं आहे. "मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 102 वी घटनादुरुस्ती व इंदिरा स्वाहनी प्रकरणातील 50 टक्के आरक्षण मर्यादा या मुद्द्यांमुळे पूर्णपणे केंद्राच्या आधीन आहे. संसदेत कायदाही होऊ शकतो. मविआ नेते भेटल्यावर मोदीजी निश्चित निर्णय घेतील. #मोदी_है_तो_मुमकिन_है" असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख या नात्यानं मोदींची स्वतंत्र भेट घेण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि मोदींची भेट व्हावी यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्नशील असल्याची माहिती एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. मात्र अद्याप तरी याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मोदी आणि ठाकरे यांच्यात 10 मिनिटांची वेगळी भेट व्हावी असा शिवसेना नेत्यांचा प्रयत्न आहे. या भेटीत राजकीय चर्चा होऊ शकते.

मुख्यमंत्री ठाकरे 'वेगळ्या नात्यानं'देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार?; दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी

मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दिल्लीला पोहोचले. त्यावेळी शिवसेनेचे काही नेते त्यांच्या स्वागताला विमानतळावर गेले. यामध्ये नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांचा समावेश आहे. 'मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची स्वतंत्र भेट होईल का याबद्दल मला कल्पना नाही. तशी माहिती माझ्याजवळ नाही. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी दिल्लीत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात मराठा आरक्षणाबद्दल चर्चा होईल,' असं पाटील यांनी सांगितलं.

Web Title: Congress Sachin Sawant Says modi hai to mumkin hai Over Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.