मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयाने केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारणही तापलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे.
सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं सीबआयने म्हटलं. यावरून सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत त्यांनी एक ट्विट केलं आहे. 'भाजपाचं तोंड काळ होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा राजकारणासाठी वापर करण्याचं पाप भाजपाला खूप महागात पडणार आहे,' असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं एक ट्विट केलं आहे.
सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, मित्र संदीप सिंह यांनी सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोप काही whatsapp वरील चॅटवरून समोर आले आहे. ड्रग्जच्या विषयावरुन आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी बॉलिवूडमधील ड्रग्जच्या नेक्ससची चौकशी करावी अशी मागणी केली होती. कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र पाठलं आहे. त्याचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. याच फोटोवर रिप्लाय करताना सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत या प्रकरणामध्ये राज्य सरकारने भाजपा अँगलनेही तपास करावा अशी मागणी केली आहे.
राम कदम यांचं ट्विट रिट्विट करत सचिन सावंत यांनी थेट भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना मी विनंती करतो की भाजपा अँगलकडेही लक्ष द्यावे. सीबीआयकडून संदीप सिंहची सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. संदीप हा बायोपीक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता होता. ज्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले,” असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये संदीप सिंह, फडणवीस, चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय एकाच स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे.
सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...
सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर के. के. सिंह यांनी एक विधान केलं आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या संपत्तीचा कायदेशीर वारस म्हणून स्वतःचं नाव दिलं आहे. के. के. सिंह यांनी ' मी सुशांतसिंह राजपूतच्या संपत्तीचा कायदेशीर वारस आहे. सुशांतने ज्या वकील, सीए आणि इतर कर्मचाऱ्यांना ठेवले होते आणि अन्य लोकंही जे त्याच्यासाठी काम करत होते ते आता सर्व संपलं आहे. आता त्यांना सुशांतबद्दल सांगण्याचा किंवा बोलण्याचा कोणताही अधिकार नाही' असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"केंद्र सरकार 'हा' निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
माणुसकीला काळीमा! शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ
शाब्बास पोरी! जखमी झाली तरी नेटाने लढली, 15 वर्षीय मुलीने चोरांना चांगलीच अद्दल घडवली