“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवावे, जनतेची मोठी मागणी”; PM मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 15:13 IST2021-08-06T15:11:38+5:302021-08-06T15:13:14+5:30
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवावे, जनतेची मोठी मागणी”; PM मोदींना टोला
मुंबई: टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू देशाचे नाव उंचावत पदके पटकावत आहेत. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे. (congress sanjay nirupam criticised pm modi over rajiv gandhi khel ratan award renamed)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद पुरस्कारने यापुढे ओळखले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
“संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते”; अमोल कोल्हेंचे खास ट्विट
जनतेची मोठी मागणी आहे की...
प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जनतेची अशी मोठी मागणी आहे की, अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे. खेळाडूंच्या सन्मानामध्ये देखील राजकीय डावपेच का?, अशी विचारणा करत हा निर्णय चुकीचा असून माझा त्याला विरोध आहे, असे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे.
Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा; बिर्लांच्या प्रस्तावावर BJP खासदाराची सूचक प्रतिक्रिया
दरम्यान, या पुरस्काराची सुरुवात १९९१-९२ मध्ये झाली होती. तेव्हा या पुरस्काराचे नाव देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर नावावर ठेवले होते. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येत होते. खेळाडूंना सन्मानित करून त्यांची प्रतिष्ठा वाढवणे. समाजात अशा खेळाडूंना प्रतिमा उंचावणे यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जात होता. मात्र, आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.