"नितीश कुमार मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल भाजपाच्या हाती असेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 08:44 AM2020-11-16T08:44:18+5:302020-11-16T08:49:50+5:30
Nitish Kumar And Bihar Assembly Election Result : नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण यावेळी राज्याची सूत्र दुसर्याच्या कोण्याच्या तरी हाती असतील असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे.
पाटणा - संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. सोमवारी सकाळी कुमार यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण यावेळी राज्याची सूत्र दुसर्याच्या कोण्याच्या तरी हाती असतील असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाने राजकीय खेळी करून नितीश कुमार यांची ताकद कमी केली असा आरोप देखील अन्वर यांनी केला आहे.
"नितीश कुमार हे पूर्वी एनडीए आघाडीचे मोठे नेते आणि मुख्यमंत्री होते. मात्र यावेळी भाजपाने त्यांना आपल्या रिमोट कंट्रोलवर चालणारा मुख्यमंत्री बनवलं आहे" असं तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान बिहारमध्ये नितीश कुमार यांची एनडीएने विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीश कुमार हे आमदारांसह राज्यपालांना भेटले. त्यानंतर आता नितीश कुमार हे सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
Earlier, Nitish Kumar Ji emerged as a good NDA leader in #Bihar. But this time, his chances are not the same. The BJP has conspired to weaken him. Now even if he is elected as NDA’s leader or Chief Minister, someone else will have the remote to control him: Tariq Anwar, Congress pic.twitter.com/YPc5UhDJJX
— ANI (@ANI) November 15, 2020
तारिक अन्वर यांच्या काँग्रेस पक्षाने महाआघाडी अंतर्गत बिहारमध्ये एकूण 70 जागा लढवल्या. पण फक्त 19 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. जागावाटपात उशीर झाल्याने आवश्यक तेवढा प्रचार करता आला आहे, हे पराभवाचं कारण असल्याचं तारिक अन्वर यांनी याआधी म्हटलं होतं. तसेच बिहारमध्ये सत्ता बदलाची लाट आली. पण ही संधी आम्हाला मिळवता आली नाही असं देखील ते म्हणाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नितीश कुमार यांची कसोटी लागणार
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.
"मित्र आणि शत्रुंना ओळखा, आपल्या आणि परक्यांमध्ये फरक ओळखायला शिका, परिस्थिती ओरडून सांगतेय की एक व्हा" https://t.co/moAbLwByDq#BiharElectionResults2020#AIMIM#AkbaruddinOwaisi
— Lokmat (@MiLOKMAT) November 15, 2020