'त्या' सुसाईड नोटवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 10:15 AM2021-03-07T10:15:41+5:302021-03-07T10:24:36+5:30

Congress unhappy with ncp over investigation in MP Mohan Delkar Death Case: प्रकरणाचा तपास वेगानं होत नसल्यानं काँग्रेस नाराज; गृहखात्याबद्दलची तक्रार मंत्रिमंडळ बैठकीत केली जाण्याची शक्यता

Congress unhappy with ncp over investigation in MP Mohan Delkar Death Case | 'त्या' सुसाईड नोटवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार

'त्या' सुसाईड नोटवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार

Next

मुंबई: अपक्ष खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचं पडसाद आज होणाऱ्या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात गृह खात्याकडून वेगानं तपास होत नसल्याची काँग्रेसची तक्रार आहे. गृहखात्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख यांच्याकडे आहे. डेलकर प्रकरणात गृहखातं ढिलाई दाखवत असल्याचं काँग्रेस नेत्यांना वाटतं. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. (Congress unhappy with investigation in MP Mohan Delkar Death Case)

मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपा नेत्यांची नावं, चौकशीबाबत फडणवीस म्हणतात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. पत्रात डेलकर यांनी भाजपच्या काही बड्या नेत्यांच्या नावांचादेखील उल्लेख केला आहे. मात्र असं असूनही गृह खातं प्रकरणाचा तपास वेगानं करत नसल्याची काँग्रेस तक्रार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत काँग्रेस नेते हा मुद्दा उपस्थित करू शकतात किंवा यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करू शकतात.

खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं नाव; काँग्रेसचा गौप्यस्फोट

काँग्रेसचा नेमका आक्षेप काय?
सुशांत सिंह राजपूत, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून भारतीय जनता पक्षानं सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पालघर मॉब लिन्चिंग प्रकरणातही भाजपनं आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपनं अनेक प्रकरणं लावून धरत महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न केले. मात्र डेलकर प्रकरणात भाजपच्या नेत्यांची नावं सुसाईड नोटमध्ये असूनही गृह खातं अतिशय संथपणे तपास करत असल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे. त्यामुळे गृह खात्यावर दबाव वाढवण्याची रणनीती काँग्रेसनं आखली आहे.

Web Title: Congress unhappy with ncp over investigation in MP Mohan Delkar Death Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.