काँग्रेस मंत्र्याचा सूचक इशारा; “भाजपा नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मी सांगेन, पण...”
By प्रविण मरगळे | Published: February 16, 2021 01:36 PM2021-02-16T13:36:58+5:302021-02-16T13:41:15+5:30
Congress Vijay Wadettiwar Statement in over Sanjay Rathod trouble in Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली, प्रकरणाचा गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांचा राजीनामा घेतल्याची माहिती आहे.
चंद्रपूर – पूजा चव्हाण आत्महत्येनंतर(Pooja Chavan Suicide) राज्यातील राजकारणात विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा धारेवर धरलं, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर मुंडे यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला. हे प्रकरण ताजे असतानाच मंत्री संजय राठोड हे प्रकरण समोर आलं, त्यामुळे महाविकास आघाडी सरका वादाच्या भोवऱ्यात सापडलं. (Vijay Wadettiwar Reaction on Sanjay Rathod Resignation in Pooja Chavan Suicide Case)
मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोडांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा
संजय राठोड(Sanjay Rathod) प्रकरणात विरोधी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली, प्रकरणाचा गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी राठोडांचा राजीनामा घेतल्याची माहिती आहे. मात्र संजय राठोड मीडिया ट्रायलचे बळी ठरलेत असं विधान काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी केलंय.
पूजा चव्हाण आत्महत्या ते मंत्री संजय राठोडांचा राजीनामा; आतापर्यंतच्या घडामोडी वाचा एकाच क्लिकवर
याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपा नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील, परंतु भाजपा नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली, ते योग्य केले. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही
संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप मला काही माहिती नाही, परंतु संजय राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे, सरकारचे प्रमुख लोकं त्या विषयाशी संबधात निर्णय घेतील, संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत, शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नाही असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्याचा कडक इशारा
काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव तरूणीच्या आत्महत्येशी जोडलं गेलं आहे, त्यामुळे शिवसेनेची आणि सरकारची नामुष्की होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन एकप्रकारे इतरांना कडक इशारा दिल्याचंही बोललं जातंय.
संजय राठोड मौन सोडणार?
पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अज्ञातवासात असलेले मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.