भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कांग्रेसची एक कथिट टूलकिट दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचं आहे. कुंभला सुपर स्प्रेडरप्रमाणे सांगायचं आहे. परंतु ईदला काहीच म्हणायचं नाही," असं पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटलं. दरम्यान, यावर काँग्रेसनंही स्पष्टीकरण देत हे खोटं असल्याचं म्हटलं. तसंच त्यांनी संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा इशाराही दिला. "भाजप कोविडच्या मिसमॅनेजमेंटबाबत टूलकितचा बनावट प्रपोगंडा चालवत आहे आणि काँग्रेसवर आरोप केले जात आहेत. आम्ही भाजपाचे अध्यक्ष जेपी नज्जा आणि संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत. जेव्हा देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे, त्यावेळी हे लोक मदत करण्याऐवजी अशाप्रकारे खोटं पसरवत आहेत," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राजीव गौडा यांनी दिली.
टूलकिटवरून पुन्हा जुंपली; संबित पात्रांनी केले आरोप, काँग्रेसकडून खंडन करत FIR ची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 15:48 IST
Congress Vs BJP : संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा. भाजप कोविडच्या मिसमॅनेजमेंटबाबत टूलकितचा बनावट प्रपोगंडा चालवत असल्याचा काँग्रेसचा आरोप
टूलकिटवरून पुन्हा जुंपली; संबित पात्रांनी केले आरोप, काँग्रेसकडून खंडन करत FIR ची तयारी
ठळक मुद्देसंबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा. भाजप कोविडच्या मिसमॅनेजमेंटबाबत टूलकितचा बनावट प्रपोगंडा चालवत असल्याचा काँग्रेसचा आरोप