चंदिगड - सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल आता येऊ लागले आहेत. शेतकरी आंदोलनाचा प्रभाव या निकालांवर दिसून येत असून, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या रोषाचे केंद्र ठरलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे.पंजाबमधील पालिकांच्या आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. तर शिरोमणी अकाली दल दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपाला शेतकरी आंदोलनाचा फटका बसला असून, भाजपाची मात्र मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षानेही काही ठिकाणी विजय मिळवण्यात यश मिळवले आहे.
पंजाबमधील पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बोलबाला, मतदारांनी भाजपाला असा कौल दिला
By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 11:42 AM
Punjab Local Body Elections Result Live Updates : सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल आता येऊ लागले आहेत.
ठळक मुद्देपंजाबमधील पालिकांच्या आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे शिरोमणी अकाली दल दुसऱ्या स्थानावर आहेभाजपाला शेतकरी आंदोलनाचा फटका बसला असून, भाजपाची मात्र मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे