कोरोना संकटामध्ये (Corona Pandemic) एकीकडे नेत्यांची गोमूत्र, शेण लावण्याचा आणि योगा करण्याचे सल्ले देणारी वक्तव्ये थांबत नसताना असताना उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य समोर आले आहे. त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. (Former Uttarakhand chief minister Trivendra Singh Rawat on Thursday said that coronavirus is a living organism which has a right to live.)
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटलेला व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. त्यांनी गुरुवारी एका स्थानिक चॅनलला मुलाखत देताना म्हटले की, कोरोना व्हायरस एक जीव आहे, इतर लोकांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही मानव स्वत:ला बुद्धीमान समजतो आणि त्याला संपविण्यासाठी तयार आहोत. यामुळे कोरोना स्वत:ला सतत बदलत आहे.
रावत यांनी पुढे म्हटले की, मानवाला सुरक्षित राहण्यासाठी कोरोना व्हायरसच्या पुढे जाण्याची गरज आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत. देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर झगडत आहे आणि डोंगराळ भाग ते मैदानात प्रत्येक जागेवर हाहाकार उडालेला आहे. असे असताना नेत्यांची ही वक्तव्ये खेदजनक असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते गौरव पंधी यांनी सांगितले की, असे लोकांच्या वक्तव्यामुळे आश्चर्य वाटू नये, आपला देश आज जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित संकट झेलत आहे. एका युजरने तर या कोरोना व्हायरस जीवाला सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमध्ये आश्रय दिला जावा, अशी चपराक लगावली आहे.
अन्य एका युजरने तर कोरोना व्हायरस हा प्राणी आहे तर त्याचे आधार, रेशन कार्डदेखील असेल? असा टोला लगावला आहे.