डोंबिवली - गेल्या अनेक दिवसांपासून या महापालिका हद्दीत कोविड लसीकरण प्रक्रिया बंद पडली आहे, महापालिका प्रशासन नेमकं करतेय काय? खासगी रुग्णालयात कोविड लस मिळते आहे तशी जी असेल ती टेंडर प्रकिर्या पूर्ण करून कोविड लस उपलब्ध करावी आणि सामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. रविवारी भाजपतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ( If corona vaccine is available in a private hospital, why can't the municipal corporation provide it? Question by Praveen Darekar)
महापालिका स्तरावरील मूलभूत समस्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. घनकचऱ्यावरील उपकर संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी कोविड काळात येथील नागरिकांना आर्थिक संकटात टाकत असल्याबद्दल नाराजी व्यक्त।केली. तसेच डोंबिवली शहर हे विज विषयात ग्रेड ए मध्ये येत असले तरीही येथील नागरिकांना भरमसाठ बिलाना आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, हे योग्य नाही. येथील नागरिकांसह राज्यातील त्रस्त ग्राहकांची त्यातून सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी दोन दिवसात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ऊर्जामंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. शहरातील रस्त्यांची समस्या देखील राज्य शासनाने सोडवावी, युतीत असताना त्यावर तोडगा काढला होता, तो तातडीने पूर्ण करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी दरेकर। यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केली.
कोविड लस घेतलेल्याना रेल्वे प्रवास हवाच ज्या नागरिकांनी कोविडच्या दोन लस घेतल्या आहेत त्यांना रेल्वे प्रवास हवा, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील कर्जत, कसारा मार्गावरील प्रवाशांना ती मुभा तातडीन देण्यात यावी. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने भेटणार असल्याचे दरेकर म्हणाले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा केंद्रात विचार केला जाईल असे स्पष्ट विधान।केले आहे. राज्याने पाऊल उचलावे असे आवाहन दरेकर यांनी आघाडी सरकारला केले.