ठाणे : कोरोनाचे रुग्ण आता पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून ही धोक्याची घंटा आहे.मात्र तरीही नागरिक सोशल डिस्टनसिंग तसेच कायद्याचे पालन करत नसल्याने यापुढे एक महिना मुंब्र्यात कोणत्याच कार्यक्रमाला येणार नसल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मुंब्र्यात अद्ययावत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मुंब्र्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या हौशी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीत आणि रुग्णवाहिका सेवेत अक्षरशः सोशल डिस्टनसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला होता.त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना सोशल आणि फिजिकल डिस्टनसिंग राखण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे.
आता जर नागरिक फिजिकल डिस्टनसिंग पाळणार नाहीत तर यापुढे मुंब्र्यात एक महिना येणार नसल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले असून यानंतर तरी मुंब्रा येथील नागरिक जबाबदारीने वागतील का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे .