coronavirus: "अमोल कोल्हे यांनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून ४०० कोटी खर्चुन वडलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 01:49 PM2021-04-21T13:49:37+5:302021-04-21T13:50:39+5:30

coronavirus in Maharashtra : देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट आणि कोविड सेंटरची गरज असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला देणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांची टीका.

coronavirus: BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize NCP MP Amol Kolhe & CM Uddhav Thackeray | coronavirus: "अमोल कोल्हे यांनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून ४०० कोटी खर्चुन वडलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’’

coronavirus: "अमोल कोल्हे यांनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून ४०० कोटी खर्चुन वडलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’’

Next

मुंबई - देशावर आलेले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट गंभीर झाले आहे. मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आला असून, रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट आणि कोविड सेंटरची गरज असल्याचा सल्ला दिला होता. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.   (BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize NCP MP Amol Kolhe & CM Uddhav Thackeray)

पंतप्रधाना नरेंद्र मोदींना सल्ला देणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उलट सल्ला दिला आहे. "देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोविड केअर सेंटरची जास्त गरज" असे तत्त्वज्ञान पाजळणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हे ज्ञानामृत या भयानक परिस्थितीत सरकारी तिजोरीतून ४०० कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

दरम्यान, कोरोनामुळे देशात आणि बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या २ लाख ९५ हजार ४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २ हजार २३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यामध्येही कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली दिसून आली. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६२ हजार ०९७ नवे रुग्ण सापडले. तर दिवसभरात ५१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर गेल्या २४ तासांत ५४ हजार २२४ जणांनी कोरोनावर मात केली होती. 
 

Web Title: coronavirus: BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize NCP MP Amol Kolhe & CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.