मुंबई – राज्यात कोरोना संकट काळात स्थलांतरित मजुरांसाठी करत काम करत असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली. काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला त्यानंतर भाजपा आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपा आमदार राम कदम यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, स्वत:ही करायचं नाही. सोनू सूदसारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत आहेत, त्यांचे कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत टीका करत आहेत. हाच तुमचा माणुसकीचा धर्म आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नाहीत, म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत. प्रत्येक घरात उपासमार सुरु आहे. मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही, दुसरे करतात त्यांना तरी तरी करु द्या. शिवसेना नेते संजय राऊत यांचे विधान दुर्दैवी आहे. स्वत:चं सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलं आहे. हे खरं सोनू सूदवर आरोप केल्याने लपू शकणार नाही असा टोलाही राम कदम यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’च्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या अशाच व्यवहाराचा भांडाफोड केला आहे. सोशल माध्यमांवर इन्स्ट्राग्राम, ट्विटर अकाऊंटवरून छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते व त्यासाठी महिन्याला ‘दीड कोटी’ इतकी बिदागी त्याने मागितली होती. भारतीय जनता पक्षाचा नेता बनून सूदला भेटलेला ‘कोब्रा’चा प्रतिनिधी व सूदमधील व्यवहार्य संवाद धक्कादायक आहे.
पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत. त्यामुळे मजुरांचे दुःख वगैरे पाहून सूद महाशय भावनाविवश झाले, त्यांच्यातल्या माणुसकीची ज्योत फडफडू लागली, यावर कोणी शहाणा माणूस विश्वास ठेवायला तयार नाही. कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय? अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा
...तर खुलासा लवकरच होईल; अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप
जाणून घ्या, एटीएम मशीनला हात न लावता अवघ्या २५ सेकंदात ग्राहकांना पैसे काढता येणार!