चंदीगड : भारतीय किसान युनियनने नियोजित धरणे आंदोलन करू नये कारण त्याला सुपर स्प्रेडरचे रूप येऊ शकते, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी रविवारी केले. राज्यात कोविड महामारी रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप सिंग यांनी फेटाळून लावला. इतर राज्यांत कोरोना ज्या वेगाने फैलावला त्या मार्गावर जाण्यापासून पंजाबला रोखण्यासाठी आमच्या सरकारने कठोर परिश्रम केले, असेही ते निवेदनात म्हणाले. पटियालात तीन दिवसांचे नियोजित धरणे आंदोलन राज्यात कोरोनाला अडवून जे काही लाभ मिळाले ते नाहीसे करण्याची जास्त शक्यता आहे.
coronavirus: बीकेयूने नियोजित शेतकरी धरणे आंदोलन करू नये : अमरिंदरसिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 6:05 AM