मुंबई - राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. (coronavirus in Maharashtra) राज्यातील रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. काही ठिकाणी वैद्यकीय साधनसामुग्रीचीही मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यातच काल रात्री नालासोपारा येथे ऑक्सिजनच्या अभावी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते. त्यावरून आता भाजपाने ( BJP MLA Atul Bhatkhalkar ) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (coronavirus: "Death could have been prevented if oxygen had been stored instead of collecting ransom" BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Maharashtra Government )
या घटनेवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात की, नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते, असा टोला भातखळकर यांनी या ट्विटमधून लगावला आहे.
दरम्यान, गंभीर कोरोना रुग्णांना दाखल करून घेणारे आमचे रुग्णालय या परिसरातील एकमेवर रुग्णालय आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांना सहव्याधी होत्या, असे स्पष्टीकरण या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले आहे.