Coronavirus: “पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या”; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘ती’ चूक काँग्रेसनं पकडली, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 11:52 AM2021-05-19T11:52:01+5:302021-05-19T11:53:51+5:30
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारसभेत गर्दी जमा करून त्यांनी ते उदाहरण समोर ठेवलं आहे. जे मनात असतं तेच होठांवर येते असा टोला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सगळेच चिंतेत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होत असली तरी देशावरील कोरोनाचं संकट टळलं नाही. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना नकळत एक चूक केली ती आता महागात पडत आहे. विरोधी पक्ष काँग्रेसनं ही चूक पकडताच त्यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने याबाबत स्वत:च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात नरेंद्र मोदी म्हणतायेत की, देशात पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या. कोरोना चाचणी वाढवल्या पाहिजेत. नेमकं पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या या वाक्यात मोदी फसले. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली. ट्विट करत म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात पॉझिटिव्ह केस वाढवण्यासाठी प्रयत्न करा असं फक्त म्हणत नाही तर पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारसभेत गर्दी जमा करून त्यांनी ते उदाहरण समोर ठेवलं आहे. जे मनात असतं तेच होठांवर येते असा टोला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
प्रधानमंत्री जी 'पॉजिटिव केस' बढाने का प्रयास करने के लिए सिर्फ कह नहीं रहे हैं, बल्कि पश्चिम बंगाल में चुनावी रैलियों में भीड़ गिनकर इन्होंने पहले उदाहरण प्रस्तुत किया है- पॉजिटिव केस बढ़ाने का।
— Congress (@INCIndia) May 18, 2021
वैसे भी जुबां पर वही आता है, जो दिमाग में चल रहा होता है।#COVID19Indiapic.twitter.com/EdYromc5pt
जगात मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसचे टूल किट
देशात सापडणाऱ्या विषाणूला ‘भारतीय स्ट्रेन’किंवा ‘मोदी स्ट्रेन’असे संबोधण्याचे कथित टूल किट जारी करून काँग्रेस जगभरात देशाची आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करू पहात आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केला. परंतु काँग्रेसने हे टूल किट बनावट असल्याचा सांगत याचा इन्कार केला आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट केले की, देशात कोरोना महामारीचे संकट असताना राहुल गांधी मात्र या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याची संधी शोधत आहेत, ही अतिशय शरमेची बाब आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देशातील कोरोना विषाणूला मोदी स्ट्रेन म्हणा, असे सांगितले जात आहे. टूल किटचा हवाला देत पात्रा यांनी म्हटले आहे की, काही परदेशी पत्रकारांच्या मदतीने काँग्रेस भारताची प्रतिमा मलिन करू पहात आहे.