"पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री जबाबदारी झटकताहेत, लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा करताहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:21 PM2021-05-07T17:21:25+5:302021-05-07T17:25:19+5:30
CoronaVirus Live Updates P Chidambaram Slams Narendra Modi And Dr. Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,14,188 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 3,915 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,14,91,598 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,34,083 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 36,45,164 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,76,12,351 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान कोरोना परिस्थितीवरून काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून हात झटकले आहेत. लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा सुरू आहे" असा गंभीर आरोप चिदंबरम यांनी केला आहे. पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. "महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा हे एक कटू सत्य आहे. पण सरकार हे अजूनही नाकारत आहे. तामिळनाडूमध्ये 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना पहिला डोसही मिळत नाही आहे आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे" असं म्हटलं आहे.
18 से 44 के बीच के किसी को भी टीका नहीं लग रहा है।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 7, 2021
अन्य राज्यों में भी स्थिति बहुत अलग नहीं है।
प्रधानमंत्री और स्वास्थ्य मंत्री अपनी जिम्मेदारी से हाथ खड़े कर, लोकतांत्रिक सिद्धांतों का मजाक उड़ा रहे हैं।
"18 ते 44 वर्षे वयोगटातील कोणालाही लस मिळत नाही. इतर राज्यांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून हात झटकले आहेत. लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा करत आहेत" अशा शब्दांत चिदंबरम यांनी निशाणा साधला आहे. पी चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. तसेच जाहीर आव्हान दिलं होतं. "आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची 1 मे रोजी कसोटी असेल. राज्यांकडे लसींचा मुबलक साठा असल्याचा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल. कोणतंही राज्य 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नाही. इतकंच नाही तर CoWin App ही सहकार्य करत नाही. जर लस नाही म्हणून 1 मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?" असं चिदंबरम यांनी म्हटलं होतं.
राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले...#Congress#RahulGandhi#NarendraModi#modigovernment#CentralVistaProject#CoronavirusIndiahttps://t.co/kp2doKvfG5pic.twitter.com/v9JvVj9NYA
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021
"देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात"; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 'हे' सल्ले
काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचं म्हणत मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे. कोरोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे असा गंभीर आरोपही राहुल यांनी आपल्या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षीसारखं गरिबांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने आर्थिक मदत पोहचवण्यात यावी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"तुम्ही काहीच करू शकत नसाल तर खुर्ची रिकामी का नाही करत?", येचुरींचा हल्लाबोल#CoronavirusIndia#CoronavirusPandemic#sitaramyechury#modigovernment#NarendraModihttps://t.co/Z8IHcMkT44pic.twitter.com/Rtwh1XUYZ7
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021
CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोनामुळे भयंकर इन्फेक्शन; वेळेत उपचार झाले नाहीत तर रुग्णांना गमवावे लागताहेत डोळे #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/0winvlSqKe
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021