शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

काँग्रेसचा बडा नेता म्हणतो, "नरेंद्र मोदींना सोयरसुतक नाही; नितीन गडकरी पंतप्रधान हवेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 12:36 PM

नितीन गडकरींच्या रुपात मराठी माणूस पंतप्रधान होतोय तर आनंदच; काँग्रेस नेत्याची बॅटिंग

मुंबई: कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे सोपवायला हवं, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केली होती. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीदेखील त्यांच्या सूरात सूर मिसळला आहे. कोरोनामुळे देशात अनेकांचा जीव गेला. मात्र पंतप्रधान मोदींना त्याचं सोयरसुतक नाही. नितीन गडकरींनी पंतप्रधान असायला हवं होतं, असं नाना पटोले म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (Nitin Gadkari Should be PM instead of Narendra Modi says Congress Leader Nana Patole)कोरोना लसीच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी दहा कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला दिला. त्यावरुन नाना पटोले यांनी टोला लगावला.  'मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही. पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत. मात्र मोदींना त्याचं सोयरसुतक नाही,' अशी टीका पटोलेंनी केली.देशातील लसटंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींचा PM मोदींना 'दस नंबरी' मंत्रमोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय याचा आम्हाला आनंद आहे. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो, त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. त्यामुळे मला आनंद वाटतो, असं नाना पटोले म्हणाले.आता शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजलीकेंद्र सरकारनं दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष केलं. उलट कोरोना संपला असं सांगण्यात आलं. त्याचे परिणाम काय झाले हे आपण सगळ्यांनी पाहिलं, अशी टीका पटोलेंनी केली. कोरोना महामारीत लोकांचा जीव गेला. शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी देशोधडीला लागला. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट देऊ असं मोदी म्हणाले होते. पण आता शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजली आहे, असं नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या