ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम असतांना काही आदर्श काम करण्याऐवजी केवळ विरोधाला विरोध म्हणून दहीहांडी साजरी करुन कोरोनाला आमत्रंण देण्याचे जे काही केले जात आहे, त्यांनाच उद्या या ऑक्सीजनची गरज लागणार असल्याची खरमरीत टिका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मनसेवर केली आहे. (Only those who invite coronavirus need oxygen, Sanjay Raut tweaks MNS)
ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लानटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ही टिका केली. आज कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिस:या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना बाबत काही र्निबध कायम ठेवण्यात येत आहेत. परंतु असे असतांना मनसेने हे निर्बंध झुगारुन दहीहांडी उत्सव साजरा केला आहे. त्यावरुन राऊत यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. दहीहांडी उत्सव साजरा करुन केवळ कोरोनाला आमत्रंण देण्याचे कामच या मंडळींकडून सुरु आहे. त्यामुळे अशांनाच आता या ऑक्सीजनची गरज लागणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्र, केरळ, मेघालय या तीन राज्यांना कोरोनाच्या तिस:या लाटेचा धोका संभावण्याची अधिक शक्यता आहे. परंतु तरी देखील महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष आणि संघटना, मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद करतात.दहीहांडीसाठी आंदोलन करीत आहेत, परंतु आमचे ऐकू नका, केवळ विरोधाला विरोध केला जात आहे.
परंतु केंद्र सरकारने सल्ला दिला आहे, की महाराष्ट्राला धोका आहे, म्हणून आता तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शहा हे हिंदु विरोधी आहेत असे म्हणाल का? असा सवालही त्यांनी राज्यातील भाजपच्या मंडळींना करीत तुम्हाला घंटाच वाजवायचा असेल तर दिल्लीत जाऊन वाजवा महाराष्ट्रात घंटा वाजवू नका असा सल्लाही दिला.
ऑक्सीजन हा मोकळ्या हवेतून मिळतो आणि तो पुरसा आहे, असे वाटत होते. परंतु, कोरोनाने वेगळे शिकविले आहे, हा ऑक्सीजन पुरेसा नाही, रुग्णांसाठी खास करुन कोरोना रुग्णांसाठी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ऑक्सीजनची गरज असते, त्याचा सुध्दा तुटवडा पडल्यावर माणसांना प्राण गमवावे लागतात. परंतु महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे आतार्पयत ऑक्सीजन अभावी एकाचेही प्राण गेलेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.