शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

coronavirus: "महाराष्ट्राची मदत रोखणारे झारीतले राजकीय शुक्राचार्य कोण?’’, संजय राऊत यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 10:58 AM

coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत.

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरील उपचारांसाठी पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत. पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. (Sanjay Raut Criticize BJP & Central Government)

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात, अशी आमची मागणी आहे. पंतप्रधानांचं परवाचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की, ऑक्सिजन, रेमडेसिवीर कमी पडणार नाही. मग महाराष्ट्राला का कमी पाडल्या जातायत. हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही टंचाई महाराष्ट्रात का निर्माण होतेय, हा प्रश्न पडतोय. पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? जे महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवाशी खेळताहेत. संकटाच्या प्रसंगी कुणी वैर घेऊन राजकारण करू नये. राज्याचे आरोग्यमंत्री केंद्राशी संवाद साधून प्रश्न सोडवतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशासंदर्भात भूमिका असू शकते. पण शेवटी त्यांनी राज्याराज्यातील परिस्थितीनुसार निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा असे सांगितले. त्यानुसार राज्यात निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश आलेले आहे. सरकारमधील काही मंत्र्यांनी कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन लावा, अशी मागणी केली आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनेचे सूत्र आहे, असे विधानही संजय राऊत यांनी यावेळी केले.     देशातील तीन लाखांची जी संख्या आहे ती चाचणी केलेल्यांची आहे. मात्र देशात काही अशी राज्ये आहेत जिथे चाचण्या होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात रुग्णसंख्या अधिक आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला. दरम्यान,  

गुजरातमधील भाजपाच्या कार्यालयात रेमडेसिविर मोफत मिळत आहे. वृत्तपत्रात जाहीराती येताहेत. रेमडेसिविर एकाच राजकीय पक्षाला मिळताहेत. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्याकडे रेमडेसिविर येत नाही, ही बाब गंभीर आहे. हायकोर्टाने हस्तक्षेप केलाय. पण त्याने काय होणार आहे, असा सवालही त्यांनी विचारला. मात्र महाराष्ट्रात नागूपर हायकोर्टाने राज्य सरकारला रेमडेसिविरवरून फटकारले असता संजय राऊत यांनी 

दरम्यान, केंद्र सरकारकडून इकडून तिकडून पैसा गोळा करून तो बंगालमध्ये खर्च केला जातोय.  केंद्र सरकारने राज्य सरकारचे देणे असलेला पैसा लवकर द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अमित शाहा यांनी महाराष्ट्रातील सरकार आपल्या ओझ्याने पडेल अशा केलेल्या विधानाचाही समाचार घेताना सरकारचे ओझे वाढल्यावर अमित शाहा यांना कळवू, असा टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार