शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

Sanjay Raut : महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्वीकारलंय; मोदींनंतर 'ठाकरे' हाच राष्ट्रीय ब्रँड- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 11:26 AM

Sanjay Raut: country has now accepted the leadership of Maharashtra Thackeray is national brand महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्वीकारलंय.

Sanjay Raut: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्वीकारलंय. त्यामुळे मोदींनंतर 'ठाकरे' हाच 'राष्ट्रीय ब्रँड' असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची धमक असल्याचं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 

"महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलं आहे. मोदींनंतर देशाला नेतृत्व देणारं कोण? असं विचार लोकांना पडतो. आज देशाच्या राष्ट्रीय पक्षाला मोठं आव्हान निर्माण करतील अशी ताकद 'ठाकरे ब्रँड'मध्ये आहे. देश आज ज्या संकाटातून जातोय ते पाहता देशाला आज संयमी आणि शांत स्वभावाच्या नेत्याची गरज आहे. मोदी मोठे नेते आहेतच पण त्यांच्यानंतर कुणी नाही असं होत नाही. उद्धव ठाकरे आज राज्यात कोणतीही आदळआपट न करता शांतपणे उत्तम काम करतायत. ते मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं नव्हतं. पण आज ते ज्या पद्धतीनं काम करतायत ते संपूर्ण देश पाहातोय. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे नक्कीच देशाला नेतृत्व देऊ शकतील", असं ठाम विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते 'साम' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. Sanjay Raut : country has now accepted the leadership of Maharashtra thackeray is national brand

नेहरु-इंदिरांच्या काळातही ताकदीचे १० नेते होते"भारत देश हा काही लहान देश नाही. खंडप्राय देश आहे. त्यामुळे केवळ एक नव्हे, अनेक ताकदीचे नेते सोबत असतात. नेहरू आणि इंदिरांच्या काळतही तितकेच ताकदीचे १० नेते होते. त्यामुळे नवं नेतृत्व हे नेहमीच देशाला लाभत असतं. मोदी तर आहेतच पण देशात आज उद्धव ठाकरेसुद्धा ताकदीचं नेतृत्व आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

काँग्रेस स्वबळावर लढणार, मग तु्म्ही काय करणार?राज्यात काँग्रेस पक्षानं स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी केंद्रीय नेतृत्वातून अद्याप तसं काही आम्हाला सांगण्यात आलेलं नाही असं म्हणत काँग्रेसच्या स्वबळाची हवाच काढून टाकली. "नाना पटोले यांच्याकडून सातत्यानं सांगितलं जातंय की स्वबळावर लढू आणि मुख्यमंत्री बनू, पण त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वानं तसं काही अद्याप कळवलेलं नाही. सोनिया आणि राहुल गांधी यांनी जर तसं गो अहेड दिलं असेल तर ते त्यांच्या पक्षाचं धोरण आहे. पण त्यांनी काही अद्याप सांगितलेलं नाही. केंद्रीय नेत्यांकडून तशा काही सूचना आलेल्या नाहीत", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी