शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

देशाचा मूड भाजपाबरोबर नाही, रालोआ थांबेल २३३ जागांवरच : सर्वेक्षणाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 6:13 AM

आज निवडणूक झाल्यास केंद्रातील सत्तेच्या किल्ल्या कोणाच्या हाती जातील यावर एबीपी-सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेक्षणातील आकडेवारी चकित करणारी आहे.

नवी दिल्ली : आज निवडणूक झाल्यास केंद्रातील सत्तेच्या किल्ल्या कोणाच्या हाती जातील यावर एबीपी-सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेक्षणातील आकडेवारी चकित करणारी आहे. देशाचा मूड भाजपसोबत नाही. फिकट झालेल्या मोदी मॅजिकच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या हाती ५४३ जागांपैकी २३३ जागा येतील, असे दिसत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सर्व्हे घेतला आहे. प्रियंका गांधी-वाड्रा सक्रीय राजकारणात येण्याआधी व पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी स्वीकारण्याआधी झालेल्या या सर्व्हेपेक्षा जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या सर्व्हेला अधिक महत्व आहे.>महाराष्ट्रात जोरदार लढत४८ जागांच्या महाराष्टÑात रालोआची २०१४ ची जादू चालणार नाही. येथे त्याला फक्त १६ जागा मिळतील. तर युपीएला २८ तर शिवसेनेला फक्त ४ जागा मिळतील. येथे भाजप युतीला जवळपास २५ जागांचा फटका बसेल.>मध्य प्रदेश-राजस्थानात परिणाम होणार नाही : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मध्य प्रदेश आणि राजस्थान गमावले. परंतु, लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम होणार नाही. मध्य प्रदेशातील २९ जागांपैकी रालोआच्या हाती २३ व काँग्रेसला सहा जागांवर समाधान मानावे लागेल. राजस्थानमधील २५ जागांपैकी रालोआला १८ व युपीएला ७ जागा मिळताना दिसतात.>छत्तीसगड तर गेले : छत्तीसगड विधानसभा निवडणूक भाजपने गमावली व लोकसभा निवडणुकीत त्याच्या हाती काही लागणार नाही. येथील ११ जागांपैकी फक्त ५ जागा त्याला व काँग्रेसला ६ जागा मिळतील.बुआ-बबुआची धमाल : उत्तर प्रदेशात सपा-बसपा युती रंग दाखवून २०१४ तील मोदी मॅजिकला फिके करील. ८० जागांपैकी रालोआच्या हातीफक्त २५ येतील तर अखिलेश-मायावती ५१ जागा जिंकतील, तर युपीएला ४ जागा मिळतील.>ममतांची जादू कायमभाजपने अनेक प्रयत्न करूनही पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांचा दबदबा कायम आहे. राज्यातील ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसला ३४ जागा मिळताना दिसत आहेत तर भाजपच्या खात्यात ७ व युपीएला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागेल. १४३ जागा समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, तेलगू देसम पक्ष यासारख्या प्रादेशिक पक्षांना मिळतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा