राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत लवकरच होणार निर्णय - बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 01:52 AM2020-11-07T01:52:16+5:302020-11-07T01:52:51+5:30
Balasaheb Thorat : कोरोनाचे संकट संपलेले नाही. महाआघाडी सरकार जनतेची काळजी घेत आहे. मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मंदिरात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे नियोजन करून निर्णय घेणे गरजेचे आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
सांगली : कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील धार्मिकस्थळे उघडण्याबाबत नियमावली तयार केली जात असून लवकरच निर्णय होईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी दिली.
कोरोनाचे संकट संपलेले नाही. महाआघाडी सरकार जनतेची काळजी घेत आहे. मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मंदिरात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे नियोजन करून निर्णय घेणे गरजेचे आहे, असे म्हणाले. राज्यात आता वेगळे चित्र दिसणार आहे. एक लाट येत आहे. अनेकजण काँग्रेसमध्ये येतील, त्यामुळे पुन्हा काँग्रेसची ताकद राज्यात दिसेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निधी वाटपातील अन्यायाबाबत ते म्हणाले, निधी वाटप चुकीचे होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केला नाही. तीन पक्षांचे सरकार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या ताब्यातील महापालिका, नगरपालिकांना निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
मराठा आरक्षण न्यायिक पद्धतीने : चव्हाण
मराठा आरक्षणात सगळेच पक्ष लक्ष घालत आहेत. मीच मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. याबाबत राज्य सरकारकडून लढाई देखील सुरू आहे. व्यवस्थितपणे खटला लढला, तर नक्कीच यश येणार आहे. न्यायिक पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.