मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2021) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आक्रमक पवित्रा घेत घेतला आहे. संजय राठोड, मनसुख हिरेन प्रकरणात फडणवीसांनी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. सरकारच्या मंत्र्यांनादेखील फडणवीस अडचणीत आणत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ अशोक सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे.गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंग दाखल'मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयात सभागृहात अशोक चव्हाण यांनी आज खोटं निवेदन केलं. १०२ ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. ऍटर्नी जनरलसंदर्भात त्यांनी चुकीचं विधान केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे', असं फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं. 'मुकुल रोहतगींनी सांगितल्यानुसार त्यांना ऍटर्नी जनरलनी पाठिंबा दिला. पण चव्हाणांनी ऍटर्नी जनरलच्या विरोधात चुकीची माहिती दिली,' असा दावा त्यांनी केला.सचिन वाझेंवरुन राजकारण तापलं; गृहमंत्र्यांचा शरद पवारांना कॉल, दिला महत्त्वाचा सल्ला
अनिल देशमुखांविरोधातही हक्कभंग प्रस्तावदेवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातदेखील हक्कभंग प्रस्ताव मांडला. अनिल देशमुख यांनी काल अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण (Anvay Naik Death Case) दाबल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्या प्रकरणी फडणवीस यांनी देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भदेशमुख यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. 'अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केलं नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबलं असं म्हणणं चुकीचं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहातदेखील सांगितला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही अशा प्रकारचं विधान देशमुख यांनी केलं. हे विधान न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं फडणवीस म्हणाले.