शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 9:12 AM

Balasaheb Thackeray's memorial lands worship Programme: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण न दिल्याचं समोर आलं आहे

ठळक मुद्देस्मारकासाठी अनेक परवानग्या देखील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळाल्या होत्यादेवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होतीआता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं आहे.

मुंबई – एकेकाळचे जुने मित्र आता एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना भाजपा यांच्यात बिनसलं, शिवसेनेने भाजपासोबत(BJP) असलेली युती तोडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी(Shivsena-Congress-NCP) या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी बनली, शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं.( Devendra Fadnavis is not invited For lands worship to Balasaheb Thackeray's memorial)

शिवसेना आणि भाजपा यांच्यातील दुरावा वाढत गेला. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण न दिल्याचं समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, मात्र आता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता महापौर निवास,  दादर, येथे हा कार्यक्रम होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या स्मारकाबद्दल सुभाष देसाईंनी सांगितलं की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याची माहिती देसाईंनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम रखडलं होतं, या स्मारकासाठी मुंबईच्या महापौराचं निवासस्थान ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र याठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका पार पडतात, स्मारक अद्याप झालं नाही, शिवसेनेची सत्ता येऊनही काम रखडलं आहे, शिवसेनेला महापौर बंगला बळकवायचा होता अशी टीका सातत्याने मनसेकडून केली जात होती, त्यानंतर आता या स्मारकासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात आला असून आज स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन होत आहे.

 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना