शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Lockdown: देवेंद्र फडणवीस नव्हते, नाहीतर कालच निर्णय झाला असता; उद्धव ठाकरेंचे बैठकीत वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 6:38 PM

CM Uddhav Thackeray To Devendra Fadanvis in Maharashtra Lockdown meeting: महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात शुक्रवारीच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार होती. परंतू ती आज घेण्यात आली. लोकांना बेडसाठीदेखील वणवण करावी लागत आहे. एकीकडे कोरोना लसीची टंचाई, दुसरीकडे कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसीवीर लसीची टंचाई अशी विचित्र अवस्था आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण कमालीचे वाढू लागले आहेत. लोकांना बेडसाठीदेखील वणवण करावी लागत आहे. एकीकडे कोरोना लसीची टंचाई, दुसरीकडे कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसीवीर लसीची टंचाई अशी विचित्र अवस्था आहे. यामुळे राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाहीय. अशावेळी राज्यात क़डक लॉकडाऊन होण्याची शक्यत निर्माण झाली आहे. राज्य सरकार सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेणार आहे. (Uddhav thackreay wait for Devendra fadanvis for one day for Corona Virus Lockdown meeting.)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra fadanvis) उद्देशून देवेंद्रजी तुम्ही काल नव्हता, नाहीतर कालच निर्णय झाला असता, यामुळे आज बैठक बोलावल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस बाहेरगावी असल्याने ते या बैठकीला येऊ शकणार नव्हते. यामुळे आज लॉकडाऊनसाठी बैठक बोलाविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं जाण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Govt Complete Lockdown In The State Once Again Hints CM Uddhav Thackeray) सर्वपक्षीय बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. 

कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. सध्या कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कळत नकळत कोरोनाचा प्रसार होतोय आणि हे सर्वात घातक आहे. राज्यात तरुण पिढीलाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होतेय. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असंही मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या